शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

‘बिग बी’च्या उपस्थितीत व्याघ्र संदेश रॅलीला प्रारंभ

By admin | Published: October 25, 2015 1:47 AM

वाघांचे संवर्धन व संरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी वन विभागाच्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्र व्याघ्र संवर्धन संदेश जनजागृती रॅली’ला शनिवारी प्रारंभ झाला. राज्याचे व्याघ्रदूत

मुंबई : वाघांचे संवर्धन व संरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी वन विभागाच्या वतीने आयोजित ‘महाराष्ट्र व्याघ्र संवर्धन संदेश जनजागृती रॅली’ला शनिवारी प्रारंभ झाला. राज्याचे व्याघ्रदूत ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखविला.‘बिग बी’ अमिताभ यांच्या जुहू परिसरातील जनक कार्यालयापासून सकाळी सातला या जनजागृती रॅलीला सुरुवात झाली. ‘अलायन्स रायडिंग नाईट्स’ या संस्थेतर्फे मुंबई-ठाण्याहून २० दुचाकीस्वार रॅलीत सहभागी झाले. ही रॅली मेळघाट व्याघ्र प्रकल्प, पेंच व्याघ्र प्रकल्प, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प, तसेच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देऊन परतीच्या प्रवासाला निघणार आहे.अन्न साखळीतील वाघाचे महत्त्व, वाघाविषयी सर्वसाधारण माहिती, वाघांची संख्या, महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पांची माहिती देत, व्याघ्र संवर्धन व संरक्षणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचिवण्याचे काम या रॅलीच्या माध्यमातून केले जाणार आहे.या रॅलीत राजीव तेलंग, हर्षिनी कान्हेकर, प्रणिश उरणकर, प्रथमेश साबळे, आनंद मोहनदास, व्हिक्टर पॉल, ओमयार वाच्छाा, श्रीराम गोपालकृष्णन, शार्दूल चामलाटे, शहनवाज बोंदरे, मुनिष चेतल, पल्लवी राऊत, योगेश आंबेकर, योगेश साळुंखे, जितू गडकरी, अदनान तुंगेकर, निसर्ग अग्रवाल, चंदन ठाकूर, दीपक ग्रेग्रथ, राहुल शिंदे, आकाश साळवे, दिनेश सिंग, अभिजित पी. आदी सहभागी झाले आहेत.