- अतुल कुलकर्णी
मुंबई : गेल्या सहा वर्षांत राज्यात ९३ वाघ आणि तब्बल ४४३ बिबट्यांचे मृत्यू झाले. त्यातील ५६ वाघ आणि २५१ बिबट्यांना नैसर्गिक मृत्यू आला. पण ३७ वाघ आणि १९२ बिबटे मात्र अपघातात किंवा शिकारीत मरण पावले. मानवी वस्त्या विस्तारल्या, विकासाचे मॉडेल प्राण्यांच्या जीवावर बेतू लागले, तसे ते माणसांचाही बळी घेत आहे. त्यामुळे भविष्यात हा संघर्ष अटळ आहे, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.
पुण्यातील आंबेगाव तालुक्यात बिबट्यांचे पाच बिछडे होरपळून मेले, तर शनिवारी पाडव्याच्या दिवशी चंद्रपूरमधील ब्रह्मपुरी जवळ वाघाने दोन माणसांचा जीव घेतला. यावर राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांना विचारले असता ते म्हणाले, वाघ किंवा बिबट्या यांचे नैसर्गिक भक्ष्य दोन पायांचा प्राणी माणूस हा कधीच नाही. माणसांना टाळणे हा वाघांचा मूळ गुणधर्म आहे.
पण मानवी वस्त्या विस्तारल्या, त्यातून कचरा वाढला, कचऱ्याच्या जागी डुकरं, कुत्री आणि कोंबड्या आल्या. बिबट्यांना सहज टप्प्यात हे खाद्य मिळू लागले त्यामुळे ते मानवी वस्तीत येऊ लागले. त्यातून माणूस आणि बिबट्यांचा संघर्ष वाढत चालला आहे. राज्याचे भौगोलिक क्षेत्र हे ३,०७,७१३ चौरस किलोमीटर आहे, त्यापैकी ६१,५७९ चौ. कि.मी. वनक्षेत्र आहे, तर ५०,६८२ चौ. कि.मी. जागेवर वृक्षाच्छादन आहे. तसेच ९५०० चौ. किलोमिटर एवढे अभयारण्य आणि राष्टÑीय उद्यान आहे. जंगलाची साखळी टिकल्यामुळे वाघांची, बिबट्यांची संख्या वाढली. पण जैविक दबावातून, आवळा, तेंदूपत्ता, मोहाची फुलं, करवंद, सरपण अशा असंख्य गोष्टीसाठी आजही लोक जंगलावर अवलंबून आहेत. तेंदूपत्ता किंवा मोहाची फुले काढण्यासाठी खाली वाकून काम करावे लागते. त्यामुळे वाघ किंवा बिबट्याला ती आपली शिकार वाटते. त्यातच आपल्याकडे जंगलाचे लहान मोठे एक हजाराच्या आसपास तुकडे आहेत. एकट्या संजय गांधी राष्टÑीय उद्यानाच्या चारही बाजूने पूर्वी नव्हती एवढी घरे उभी राहिली आहेत. वाघांचा अधिवास आधीपासून तेथेच होता, पण माणूस तेथे वस्तीला आला. वाघाला त्याच्या सीमेची माहिती कशी असणार? त्यातून संघर्षाच्या गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत.
वन विभाग यावर काय करत आहे असे विचारले असता नितीन काकोडकर म्हणाले की, गेल्या १० ते १५ वर्र्षात आमचा प्रतिसाद वाढला, आमच्याकडे भरपूर साहित्य उपलब्ध झाले आहे. मात्र प्राण्यांना पकडण्यापेक्षा तेथे जमलेल्या बघ्यांना नियंत्रणात आणणे अधिकाऱ्यांसाठी जास्त त्रासदायक असते. कुतूहल लोकांना गप्प बसू देत नाही.ते आम्हाला त्रासदायक ठरते.वर्ष वाघ बिबटे२०१३ १५ ४३२०१४ ६ ६५२०१५ १३ ६६२०१६ १४ ९१२०१७ २२ ८५२०१८ १९ ८८२०१९ ४ ५(एकूण) ९३ ४४३ऊ साची शेती बिबट्यांना पोषकऊ साच्या शेतीसारखी पोषक व सुरक्षीत जागा बिबट्यांना दुसरी नाही. कारण एकदा पाणी सोडले की रोज ऊ साच्या शेतीकडे बघायची गरज नसते. शेतात व आजूबाजूला डुकरे, कोंबड्या, कुत्री असतात. त्यामुळे खाद्य, पाणी आणि संरक्षण गोष्टी त्यांना तेथे मिळू लागल्या. त्यामुळे ऊ साच्या शेतात बिबट्यांचे प्रजनन वाढले आहे. त्यातूनच पुण्याची दुर्देवी घटना घडली.लोकांनी आग न लावता वनअधिकाऱ्यांना कळवले असते तर ते बछडे वाचले असते, असे प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर म्हणाले.