मुंबई : भरधाव वेगाने गाड्या चालवून अपघातांना आमंत्रण देतात म्हणून बाइकर्सवर अनेकदा टीका होते, पण हेच बाइकर्स व्याघ्र संवर्धन आणि संरक्षणाचा संदेश देत राज्यभर फिरणार आहेत. बायकर्स आता टायगर्सच्या भेटीला निघणार आहेत. राज्याच्या विविध भागांमध्ये जनजागृती करण्यासोबतच ते थेट व्याघ्र प्रकल्पांमध्ये जाऊन वाघांचे विश्वदेखील बघणार आहेत. महाराष्ट्राचे व्याघ्रदूत अमिताभ बच्चन या अनोख्या बाइकर्स रॅलीला मुंबईत २४ आॅक्टोबर रोजी हिरवा झेंडा दाखवतील. वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत अमिताभ यांच्या हस्ते बाइकर्स रॅलीचा प्रारंभ होणार आहे. ‘अलायन्स आॅफ रायडिंग नाईटस’ या संस्थेचे हे बायकर्स आहेत. बाईक रॅलीद्वारे ही संस्था सामाजिक कार्य करीत आली आहे. मुंबई-ठाण्यातील २० बाइकर्स राज्याच्या दुर्गम भागातून, जंगलांमधून २४ ते ३० आॅक्टोबरदरम्यान फिरतील. ही रॅली मेळघाट व्याघ्र प्रकल्प, पेंच व्याघ्र प्रकल्प, नवेगांव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पांना भेट देतील. (विशेष प्रतिनिधी)असा असेल रॅलीचा मार्गहे बाइकर्स ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देऊन परतीच्या प्रवासाला निघतील. ठाणे, नाशिक, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ, वाशिम, अहमदनगर जिल्ह्णांमधून रॅली जाईल.
टायगर्सच्या भेटीला बाइकर्स
By admin | Published: October 23, 2015 2:29 AM