शहरं
Join us  
Trending Stories
1
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
2
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
3
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
4
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
5
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
6
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
7
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
8
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
9
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
10
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
11
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
12
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
13
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
14
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
15
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
16
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
17
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
18
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
19
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
20
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर

MPSC exam postponed : 'एमपीएससी'ची परीक्षा नियोजित वेळेत होणार की पुढे ढकलली जाणार? विद्यार्थ्यांमध्ये 'धकधक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2020 19:29 IST

MPSC exam postponed : मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विविध संघटना व लोकप्रतिनिधी यांनी केली आहे.

ठळक मुद्देपरीक्षा पुढे ढकलली तर विद्यार्थ्यांचे पुढच्या वर्षीचे आर्थिक नियोजन ढासळणार

पुणे : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने समाजाचा उद्रेक बाहेर पडू लागला आहे. ठिकठिकाणी मोर्चे, आंदोलने करण्यात येत आहेत. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणी करण्यात येत आहे. यामुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता आहे.         मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने एमपीएससीची परीक्षा MPSC Exam Postponed  पुढे ढकलण्याची मागणी विविध संघटना व लोकप्रतिनिधी यांनी केली आहे. अधिकृत संकेतस्थळावर परीक्षा प्रवेश पत्र उपलब्ध करण्यात आले आहे. त्यामुळे सतत बदलत्या तारखांच्या खेळात अडलेली राज्य सेवा पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबरला होणार याची खात्री विद्यार्थ्यांना आली आहे. मात्र परीक्षा पुढे ढकलण्याची मागणीमुळे परीक्षा पुन्हा या वादात अडकणार की नियोजित वेळेत होणार , असा संभ्रम विद्यार्थ्यांच्या मनात आहे. परीक्षेची जाहिरात मराठा आरक्षणानुसार आली होती. परंतु आता आरक्षणाला स्थगिती भेटली आहे; मग हे आरक्षण या परीक्षेसाठी लागू आहे का, याबाबत विद्यार्थ्यांच्या मनात प्रचंड संभ्रम आहे. तरी याबाबत आयोगाने व सरकारने परिपत्रक काढून खुलासा करणे गरजेचे आहे अशी मागणी विद्यार्थी करू लागले आहेत.   कोरोनाने आधीच आर्थिक कंबरडे मोडलेले असताना कसेबसे दिवस काढत रात्रंदिवस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड सुरू आहे. अशा कारणांमुळे परीक्षा नेहमीच पुढे ढकलल्या जाऊ लागल्या अथवा दिरंगाई होत राहिली तर तरुणांचे एक ना एक दिवस मानसिक संतुलन बिघडण्याची शक्यता आहे. तसेच त्यांचे भविष्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती जाणकारांनी व्यक्त केली आहे. .... परीक्षा पुढे ढकली तर पुढच्या वर्षीचे आर्थिक नियोजन ढासळणार आहे. तीन वेळा परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने मानसिक ताण वाढला असून आर्थिक नुकसान होत आहे. आरक्षणाबाबत जो काही निर्णय होईल तो परीक्षा झाल्यानंतर लागू करण्यात यावा. मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना खात्री द्यावी. जेणेकरून अभ्यास शांतपणे करता येईल.      - वैभव गाजरे पाटील, स्पर्धा परीक्षार्थी . 

.................

आरक्षणाच्या चौकटीत एमपीएससीची परीक्षा अडकून ठेऊ नये. परीक्षा झाल्यावरही यावर निर्णय घेता येईल. मुख्यमंत्र्यांनी एसी मधून बाहेर पडून खरी परिस्थिती जाणून घ्यावी. विद्यार्थ्यांना सामोरे जावे. केवळ एका ठिकाणी बसून विद्यार्थ्यांचे प्रश्न समजणार नाहीत. आमच्या भविष्याशी खेळू नये.   पृथ्वीराज जाधव, स्पर्धा परीक्षार्थी.

टॅग्स :PuneपुणेMPSC examएमपीएससी परीक्षाStudentविद्यार्थीcorona virusकोरोना वायरस बातम्याMaratha Reservationमराठा आरक्षण