Tim Cook In India : आर्थिक राजधानी मुंबईत देशातील पहिले अॅपल स्टोअर सुरू होणार आहे. याची सुरुवात अॅपलचे सीईओ टिम कुक स्वतः करणार आहेत. यासाठी ते सध्या भारतात आले आहेत. दरम्यान, लॉन्चपूर्वी टिम कुक यांनी अँटिलिया येथे अंबानी कुटुंबाची भेट घेतली. व्हायरल भयानीने याबाबत व्हिडिओ शेअर केला आहे.
पंतप्रधान आणि आयटी मंत्र्यांची भेट घेणारइंस्टाग्रामवरील व्हिडिओमध्ये आकाश अंबानी आणि ईशा अंबानी अँटिलियाच्या गेटजवळ टिम कुकसोबत दिसत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारत दौऱ्यात टिम कुक भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आयटी मंत्र्यांचीही भेट घेणार आहेत. याबाबत पीएमओ किंवा अॅपलकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
उद्या सकाळी 11 वाजता उद्घाटनमंगळवारी अॅपलचे प्रमुख बॉम्बे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे देशातील पहिल्या अॅपल स्टोअरचे उद्घाटन करतील. हे कॉम्प्लेक्स 20 हजार स्क्वेअर फूटमध्ये बांधले आहे. हे 20 एप्रिल रोजी सुरू होणाऱ्या दिल्लीतील स्टोअरपेक्षा मोठे असेल. विशेष म्हणजे, अॅपल मुंबईतील स्टोअरचे भाडे तब्बल 42 लाख रुपये असल्याची माहिती आहे. दुसरीकडे, दिल्ली स्टोअरचे भाडे 40 लाख रुपये आहे.