केसीआर एकमेकांच्या एबीसीडीचे चट्टेबट्टे आहेत. कोणी नवीन सुरुवात करतो त्याला आमच्यासोबत जोडले जाते. केसीआर आणि आमच्यात फरक हा आहे, त्यांच्या राज्यात बंडी संजय यांच्या नेतृत्वा आंदोलन करत होती. मी देखील अनेकदा गेलो. दोन वेळा माझ्या सभेला परवानगी देण्यात आली नव्हती. केसीआर इकडे आले तेव्हा आम्ही त्यांना आमच्याकडे लोकशाही आहे. नियमानुसार परवानगी घ्यावी, जेवढ्या सभा करायच्या आहेत करा. यामुळे भाजपाची मते कमी होणार नाहीत. आम्हाला त्याची चिंता नाही, असे केसीआर यांच्या व विरोधकांच्या आरोपांवर फडणवीस यांनी उत्तर दिले.
समुद्रात वाहून जाणारे पाणी आम्ही गोदावरी पात्रात आणणार आहोत. यासाठी सात वर्षे लागतील. मुंबईची परिस्थिती वेगळी आहे. पावसात पाणी तुंबते. ते पाणी पंप करून बाहेर सोडावे लागणार आहे. ते काम गेली २० वर्षे होतच आहे. आम्ही ते अडीज वर्षात पूर्ण करू. रोजगार आणि तरुणांची लग्ने या गोष्टी आरोप करण्यासाठी बोलल्या जातात. चढ उतार येतात, जग महागाईने त्रस्त आहे. परंतू आमचा देश त्यावर नियंत्रण मिळवू शकला आहे. मी असे म्हणत नाहीय की स्वस्त झालेय. मोदींनी युरियावरील सबसिडी दिली आहे. युक्रेन युद्धामुळे युरियाचे दर तिप्पट वाढले आहेत, असे फडणवीस म्हणाले.
गडकरींसोबत कसे संबंध? गडकरींसोबत तुमचे संबंध कसे आहेत, लोक म्हणतात की एकाच म्यानमध्ये दोन तलवारी असू शकत नाहीत. या प्रश्नावर त्यांची म्यान वेगळी आहे, माझी वेगळी आहे, असे फडणवीस म्हणाले. नागपुरचा विकास हे दोघांचे काम आहे. एका पक्षाचे, एकाच शहरातील नेते समन्वयाने काम करतात हे लोकांना विश्वासच बसत नाही. नागपूर पालिकेची तिकिटे वाटण्यासाठी मी आणि गडकरी बसलो होतो. तेव्हा काही तासांनी मी गडकरींना म्हटले की, मी निघतो मला मुंबई, पुण्याची तिकटेही वाटायची आहेत. गडकरींनी रात्री मला फोन केला दोन चार जागांवर मला ठीक वाटत नाहीय. तुझे मत काय असे ते म्हणाले होते, असा एक किस्सा फडणवीसांनी सांगितला.
मी उपमुख्यमंत्री असलो म्हणून काही फरक पडत नाही. लोकसभेला राज्यातून ४२ पेक्षा कमी जागा जिंकणार नाही. मोदींना लोकांनी निवडले आहे, मला महाराष्ट्रात रहायचे आहे. मी ज्या विचारातून आलोय तिथे मोठे लोक निर्णय घेतात. त्यांनी कुठे सांगितले तिथे करेन, निर्णय त्यांना घ्यायचा आहे, असे फडणवीसांनी स्पष्ट केले. मी खूप छोटा आहे, मी चाणक्य वगैरे नाहीय. परंतू, जर माझ्यासोबत कोणी चुकीचा वागला तर लक्षात ठेवून माझी वेळ यायची वाट पाहतो. काही गोष्टी मी सांगितल्या. अन्य गोष्टींची वेळ यायची आहे, असा इशारा फडणवीस यांनी दिला होता. आम्हाला नकार दिल्यानंतर पवार मोदींना भेटायला गेलेले. तिथे त्यांनी पक्षातील काही लोक तयार नव्हते, आम्हाला तुमच्यासोबत यायचे होते, असे कारण दिलेले असे मला समजले होते, असा २०१९ च्या पहाटेच्या शपथविधीवर आणखी एक खुलासा फडणवीसांनी केला.