मुंबई : तुमच्या पायगुणाने दोन वर्षे महाराष्ट्राच्या वाट्याला दुष्काळ आला. यंदा दुष्काळ नाही, निसर्गही कोपला नाही, पण हे मायबाप सरकार शेतक-यावर कोपले, अशा शब्दांत विरोधकांनी सरकारवर टीका केली. अंतिम आठवडा प्रस्तावावर विरोधकांनी सत्ताधारी पक्षाला चांगलेच धारेवर धरले.लोकसभा निवडणुकीत भाजपाने शेतमालच्या उत्पादन खर्चावर पन्नास टक्के नफा ठेवून शेतीमालाचे हमीभाव देऊ, अशी घोषणा केली होती. पण याच वाक्याने शेतक-यांची फसवणूक केली. हे सरकार सत्तेवर येताच सलग दोन वर्षे दुष्काळ पडला. तिस-या वर्षी निसर्गाने साथ दिली, मात्र नोटाबंदीने शेतक-यांना उद्ध्वस्त केले. कर्जमाफी दिली पाहिजे असे स्वामिनाथन आयोगाने सांगितले आहे. या आयोगाची एक शिफारस तर तुम्ही स्वीकारा, अशी विनंती विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. (प्रतिनिधी)>व्यापाऱ्यांसाठी पैसा, शेतकऱ्यांसाठी नाही!सरकारने व्यापाऱ्यांचा एलबीटी माफ केला. त्यासाठी दरवर्षी आठ हजार कोटी याप्रमाणे वीस हजार व्यापा-यांसाठी पाच वर्षात ३५ ते ४० हजार कोटी देणार आहात. मग १ कोटी ३७ लाख शेतक-यांसाठी ३० हजार कोटी दिले तर बिघडले कुठे, असा सवाल मुंडे यांनी केला. कर्जमाफीवर शिवसेनेच्या वाघाचे मांजर झाले आहे, अशी टीका त्यांनी केली.
यंदा निसर्ग नव्हे, शेतकऱ्यांवर सरकार कोपले!
By admin | Published: April 07, 2017 6:01 AM