- नंदकिशोर नारे
वाशिम : उघडयावर शौचास बसल्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. उघडयावर शौचास जावू नये म्हणून शासनाच्यावतिने शौचालय बांधकामासाठी अनुदानही दिल्या जाते, असे असतांनाही अनेक जण उघडयावर शौचास जातांना आढळून येतात. नगरपरिषद वाशिमच्यावतिने शहरात उघडयावर शौचास जाणाºयांना पकडून त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्याची प्रकीयेस प्रारंभ केला आहे. प्रथम दिवस ९ आॅगस्ट रोजी उघडयावर शौचास जाणाºयांना पकडून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. जेव्हा ‘गोदरी’मध्ये स्वच्छता विभाग नगरपरिषदचे कर्मचारी मोहीमेत उघडयावर शौचास जाणाºयांचा शोध घेत होते तेव्हा अनेक जण ‘टमरेल’ घेवून पळतांना आढळून आले.
वाशिम नगरपरिषदेच्यावतिने मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्या आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली स्वच्छ भारत मिशन अंतर्गंत उघडयावर शौचालयास जाणाºयांना पकडून त्यांच्यावर कारवाईची मोहीमेस ९ आॅगस्ट सकाळपासून कारवाई करण्यास प्रारंभ करण्यात आला. या पथकामध्ये स्वच्छता निरिक्षक जितु बढेल, लाला मांजरे, दशरथ मोहळे, मुकादम व सफाई कर्मचाºयांचा सहभाग होता. वाशिम शहरातील गवळीपुरा भागातून या मोहीमेस प्रारंभ करण्यात आला. या भागातील अनेक नागरिकांना व शहरातील शौचालय नसलेल्यांना नगरपरिषदेच्यावतिने स्वच्छता गृहासाठी अर्ज मागवून शौचालय देण्यात आले आहे. त्यानंतरही अनेक जण याचा वापर न करता उघडयावर शौचास जात असल्याचे दिसून आले. गवळीपुºयात पथक दाखल झाल्याबरोब त्यांनी नागरिकांचे टमरेल जप्त केले. काहींनी सदर कारवाई पाहली व टमरेल घेवून एकच धुम ठोकली. यावेळी स्वच्छता कर्मचाºयांनी त्यांचा पाठलाग करुन त्यांना पकडून त्यांचे नावे डायरीत नोंद केली. यानंतर आपण शौचास उघडयावर जातांना आढळून आल्यास आपल्यावर फौजदारी कारवाई करण्यच्या सूचना पण यावेळी देण्यात आल्यात. जिल्हा परिषदेच्यावतिने ग्रामीण भागात ही मोहीम अनेक दिवसांपासून ‘गुडमॉर्निग’ पथकाच्यावतिने राबविण्यात येत आहे. वाशिम शहरातही ही मोहीम सुरु झाल्याने नागरिकांत आनंद व्यक्त केल्या जात आहे. जिल्हयातील ईतरही नगरपरिषद प्रशासनाने ही मोहीम राबवून उघडयावर शौचास जावून आरोग्यास निमंत्रण देणाºया या प्रकाराला आळा घालणे गरजेचे झाले आहे.