रघुनाथ पांडे - नवी दिल्ली
द्वारकापीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांनी शिर्डीच्या साईबाबांवर बेछूट मुक्ताफळे उधळल्याने उत्तरेत कट्टर हिंदू आणि मुस्लीम धर्माधिका:यांमध्ये वैचारिक धुनी पेटली आहे. आखाडय़ांचे प्रस्थ असलेल्या वाराणशी, अयोध्या, हरिद्वार, लखनौ, अलाहाबाद भागात महंत हमरीतुमरीवरही आले आहेत. मुसलमानांशी साईबाबांना जोडू नका, अशी थेट भूमिका बरेली आणि देवबंद उलेमांनी घेतली आहे. त्यामुळे एकतेचे प्रतीक मानल्या जाणा:या या फकिराला आता ‘श्रद्धा व सबुरी’ या स्वत:च्याच तत्त्वातून भक्तीचा नवमार्ग सांगावा लागणार आहे, असे दिसते.
साईबाबा देव नाहीत, मंदिर उभारून पूजा करणोही गैर, असे धार्मिक तेढ निर्माण करणारे मत शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांनी व्यक्त केले. त्यानंतर एकच गहजब साईभक्तांमध्ये निर्माण झाला. शिर्डीमध्ये लागलीच पडसाद उमटले. शिर्डी, चंदीगढ व इंदूरमध्ये प्रकरण पोलिसात गेले. वाराणशी व बैतुलमध्ये शंकराचार्याच्या प्रतिमांचे दहन झाले. आता धर्ममरतडांमध्ये वाक्युद्ध रंगले.
हरिद्वारच्या अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ज्ञानदास यांनी शंकराचार्यावर खरपूस टीका केली. स्वरूपानंद यांची बुद्धी नाठी झाली आहे. त्यांचे फक्त वय वाढले. त्यांनी असे विधान करायला नको होते, गरजही नव्हती. साईबाबा मानवतेचे दूत होते. त्यांनी मानवजातीचे भलेच केले, असे ते म्हणतात. त्याचवेळी परिषदेचे प्रवक्ते बाबा हटयोगी यांनी शंकराचार्याची बाजू घेतली. जे शंकराचार्याच्या विरोधात बोलतात ते ‘पाखंडी’ आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
विश्व सनातन धर्म परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेंद्रनाथ अवधूत यांनी साईबाबा महान संत होऊ शकतील, पण देव नाही. शंकराचार्य खरे बोलत आहेत, असे सांगितले.
आता वाद करणो अयोग्य
च्बरेलीच्या नबिरे आला हजरत मौलाना मनांन रजा खान उर्फ मननी मिया यांनी म्हटले की, साईबाबांची पूजा खूप वषार्पासून होते, आता अचानक या विषयावर विवाद करणो अयोग्य आहे. त्यांनी चर्चेत यावे म्हणून हा विषय छेडला.
च्ऑल इंडिया जमात रजा - ए - मुस्तफाचे सरचिटणीस म्हणाले की, साईबाबांमध्ये मुसलमानांना काहीही स्वारस्य नाही, ते हिंदूंचे नेता होते. ऑल इंडिया सुफी कौन्सिलचे अध्यक्ष सुफी रईस मियां कादरी म्हणतात की, साईबाबा फकीर होते. कोणताच मनुष्य ईश्वर असू शकत नाही. त्यावरून निर्माण झालेला विवाद दोन धर्मामध्ये अकारण कटुता निर्माण करण्याचा प्रय} होत आह़े