मुंबई : मुंबई-अहमदाबाद जलद गती रेल्वे- बुलेट ट्रेन मार्ग उभारणीसाठी आवश्यक विविध बाबींवर कालबध्द कार्यवाही करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ.राजीव कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मागार्बाबत आढावा बैठक फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली.बैठकीत या प्रकल्पाशी निगडित विविध बाबींवर जिल्ह्यनिहाय आढावा सादर करण्यात आला. त्यावर फडणवीस तसेच डॉ. राजीव कुमार यांनी चर्चा केली. प्रकल्पासाठी संपादित जमिनींचा मोबदला तातडीने देण्यात यावा. अन्य प्रशासकीय बाबी, मान्यता बाबतीतही वेळेत कार्यवाही करण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले. बैठकीस मुंबई महापालिकेचे आयुक्त अजय मेहता, एमएमआरडीएचे आयुक्त यु.पी.एस.मदान, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर, परिवहन विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, मुंबई मेट्रो रेल कापोर्रेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे आदी उपस्थित होते.
बुलेट ट्रेनसाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा - मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 1:31 AM