शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
6
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
7
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
8
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
9
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
13
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
14
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
15
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
16
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
17
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
18
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
19
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

नवीन काही घडताना... इस्लाममधील अंधश्रद्धांना विरोध करणारा ‘तिमिरभेद’

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2024 10:37 AM

खुद्द मुस्लिम समाजातून जे प्रयत्न होतात, ते विशेष लक्षवेधक ठरतात.

दिनकर गांगल

‘मुस्लिम सत्यशोधक मंडळा’ची स्थापना हमीद दलवाई यांनी केली, त्यास पन्नास वर्षे उलटून गेली. त्यानंतरच्या मुस्लिम धर्मसुधारकांनी ती चळवळ सतत जागती ठेवली आहे - त्यातील एक महत्त्वाचा भाग असतो अंधश्रद्धा निर्मूलनाचा. त्यासाठी नरेंद्र दाभोलकर यांनी जो मार्ग अनुसरला आणि त्यातून ज्या कायदेशीर तरतुदी निर्माण झाल्या, त्यांचा फायदा मुस्लिम धर्मसुधारकांनाही होत असतो. पण, त्या पलीकडे खुद्द मुस्लिम समाजातून जे प्रयत्न होतात, ते विशेष लक्षवेधक ठरतात.

शमसुद्दीन तांबोळी हे निवृत्त प्राध्यापक ‘सत्यशोधक मंडळा’चे अध्यक्ष आहेत. त्यांनी ‘तिमिरभेद’ नावाच्या ‘अंधश्रद्धाविरोधी मंचा’ची स्थापना १८ जून २०२१ ला केली. उम्मीद शेख नावाचे प्राध्यापक मंचाची जबाबदारी सांभाळत. त्यांनी अंधश्रद्धा कशास म्हणावे, यासाठी सहा निकष निश्चित केले आहेत. त्यांचे वर्णन कार्यकारण भावाचा अभाव, मानसिक गुलामगिरी, संविधानात्मक कर्तव्यांना बाधा, कायदा-सुव्यवस्थेचा उपमर्द, मूलभूत कर्तव्यांची पायमल्ली आणि कालबाह्य परंपरांचे अंधानुकरण असे करता येईल. साहिद शेख नावाचा तरुण तडफदार कार्यकर्ता आता मंचाचे कामकाज पाहतो. ‘तिमिरभेद मंचा’ने गेल्या तीन वर्षांत बऱ्याच चर्चा व प्रशिक्षण कार्यक्रम घडवून आणले आहेत. स्वत: शमसुद्दीन तांबोळी यांनी ‘तिमिरभेद’ नावाच्या पुस्तकात ‘मुस्लिम अंधश्रद्धांचा धांडोळा’ घेतला आहे. त्यातून पहिली गोष्ट ठसठशीतपणे स्पष्ट होते, की अंधश्रद्धा हा प्रश्न धार्मिक नसून सांस्कृतिक आहे. त्यामुळे पुस्तकातून मुस्लिम समाजातील ज्या अंधश्रद्धा प्रकट होतात, त्या हिंदू समाजात तशाच्या तशा फक्त वेगळ्या नावाने दिसून येतात. बाळाच्या जन्मानंतर पहिल्या दहा-बारा दिवसांत मुस्लिम समाजात जे विधी व समारंभ केले जातात ते तसेच्या तसे हिंदू समाजात आढळतात किंवा मुसलमानांतील मुलाची सुंता ही कित्येक वेळा हिंदूंतील मुंजविधीइतकी थाटामाटात व समारंभपूर्वक केली जाते. पुस्तकात एक विधान आहे, की मुस्लिम व ख्रिस्ती समाजांत पंधराव्या शतकापर्यंत अंधश्रद्धा सारख्याच प्रबळ होत्या. त्यानंतर युरोपात विज्ञानाचा प्रसार झाल्याने ख्रिस्ती समाजात अंधश्रद्धांचे प्रमाण बरेच कमी झाले, परंतु मुस्लिम समाज शिक्षणाअभावी रूढींचा अधिकाधिक बंदिवान होत गेला.

‘भूत’ नावाची गोष्ट सर्व संस्कृतींत आदिजीवनापासून चालत आलेली आहे. अरबी लोककथांत ‘घोल’ म्हणजे नरपिशाच्च आणि ‘गुलाह’ ही त्याची मादी म्हणून उल्लेख येतात. सुष्ट पिशाच्चाला ‘जीन’ म्हणतात तर दुष्टाला ‘सैतान’. इब्लिस किंवा सैतान हा भूताचा बाप असतो आणि मारिया ही त्याची आई. इस्लामचा प्रसार इराण, आफ्रिका, तुर्कस्थान व भारत अशा देश-प्रदेशांत झाला तेव्हा त्यांना संस्कृतीनुसार वळण कसे लागले याचे त्रोटक विवेचन पुस्तकात येते (बेनझीर तांबोळी), पण ते फार बोलके आहे. भूत उतरवण्याचे प्रकार जास्त करून दर्ग्यात होतात. काही दर्गे त्याकरता प्रसिद्ध आहेत. ‘तिमिरभेद’ या पुस्तकात विविध लेखकांनी लिहिले आहे. ते जास्त करून मुस्लिम लेखक आहेत. शेवटचा, सोळावा लेख म्हणजे पु. ल. देशपांडे यांच्या ‘एक शून्य मी’ पुस्तकातील उद्धृत आहे. त्यातील एक वाक्य येथे नमूद करावेसे वाटते - “आपल्या देशात इतके संत जन्माला यायच्याऐवजी ऐहिक जीवनाला विज्ञानाचे अधिष्ठान देणारे शास्त्रज्ञ जन्माला आले असते तर देश अधिक सुखी झाला असता.”

टॅग्स :Muslimमुस्लीम