ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - एप्रिल महिना सुरू झालाय. ऊन आणि घामाच्या धारांनी बाहेर पडणं अवघड होऊन बसलंय. अशात मेकअप करून कुठे बाहेर पडणार असा साधा प्रश्न पडतो. कारण मेकअप केला तर सगळा निघून जाईलच. पण आता पार्टी, लग्नसराई किंवा इव्हेंटचा मौसम सुरु आहे. त्यामुळे मेकअप तर करावाच लागणार. अशा वेळी साधा आणि प्रेझेंटेबल मेकअप कसा करता येईल यासाठी काही खास टिप्स जाणून घेऊयात..उन्हाळ्यात आपल्या त्वचेला सतत उष्णता जाणवत राहते आणि त्वचा चिकटही बनते. आपल्याला सतत चेहरा पुसावासा किंवा थंड पाण्यानं धुवावासा वाटतो. त्यामुळे चेह-यावरचा मेकअप निघून जातो. तुम्हालाही अशी सवय असेल तर उन्हाळ्याच्या दिवसात गडद मेकअप करणं टाळा. कारण चेहरा सतत पुसत राहिलात की मेकअप तर पूर्णपणे जात नाहीत पण त्या मेकअपचे पॅच चेह-यावर राहतात. दिसायला ते फारच वाईट दिसतं.
- मेकअप करण्यापूर्वी चेह-याला लाईट मॉईश्चरायझर लावावे. उन्हाळ्यामध्ये फाऊण्डेशन लावल्याने थोडं जड वाटू शकते. अशावेळी टिण्टेड मॉईश्चरायझर लावावे. हे दोन प्रकारे काम करते. यामुळे त्वचेला आद्र्रता मिळते आणि चेह-यावर समान टोन येतो.- लिपस्टिक/लिप बाम किंवा आय शॅडो लावताना त्वचेला शोभून दिसतील अशा लाईट पेस्टल शेड्स निवडा. सध्या पेस्टल शेडचा ट्रेंड आहे. थोडी चमक असलेले सॉफ्ट रंग तुम्हाला उत्तम समर लूक मिळवून देतील आणि त्याचबरोबर तुमचा चेहराही उजळवतील. याचा आणखी एक फायदा म्हणजे मेकअप उतरू लागला तो पटकन लक्षात येणार नाही.- उन्हाळ्यासाठी वॉटरप्रूफ मेकअप प्रॉडक्टसचा वापर करा.- तुम्हाला एखाद्या पार्टीला जायचे असेल आणि गडद मेकअप करणे आवश्यक असेल तर ब्लॉटिंग पेपरचा वापर वाईप म्हणून चांगल्या प्रकारे करता येईल. हा कागद चेह-यावर हलकेच दाबून ठेवा आणि अतिरिक्त चमक काढून टाका.- मेकअप पूर्ण करण्यासाठी अखेरीस चेह-याला ट्रान्सल्युसण्ट पावडर लावायला विसरू नका. ही पावडर चेह-यावरची जास्त चमक कमी करते आणि चेह-याला एक मॅट लूक देते.- हेअर स्टायलिंगबद्दल बोलायचं झालं तर सध्या छोटया पिक्सी हेअरकट्सची चलती आहे. साधारण मुलांचा हेअरकट कसा असतो तशा प्रकारचा हा हेअरकट आहे. तुम्हाला स्वत:च्या लूकमध्ये काही वेगळे प्रयोग करायचे असल्यास तुम्ही हा हेअरकट ट्राय करू शकता.- केस खांद्यापर्यंत लांब असतील तर थोडे केस सरळ आणि केसांची टोकं कर्ल करा. त्यामुळे केसांना एक वेगळाच बाऊन्स येतो.- केस लांबसडक असल्यास हाय-रेझ बन किंवा पोनी टेल छान दिसेल. लांब केसांच्या फिश टेलसारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेण्याही बांधता येतील.