शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
2
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
4
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
5
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
6
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
7
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
8
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
9
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
10
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
11
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
12
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
13
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
14
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
15
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
16
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
17
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
18
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
19
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?

बँकांचे थकीत कर्ज सात वर्षांत नऊपट वाढले!

By admin | Published: May 24, 2016 3:36 AM

गेल्या सात वर्षांत म्हणजे २००८ ते २०१५ या काळात २६ सरकारी बँकांच्या थकीत कर्जात नऊ पट वाढ झाली आहे. २००८ मध्ये सरकारी बँकांची थकीत कर्जे ४० हजार कोटी होती.

- सोपान पांढरीपांडे,  नागपूरगेल्या सात वर्षांत म्हणजे २००८ ते २०१५ या काळात २६ सरकारी बँकांच्या थकीत कर्जात नऊ पट वाढ झाली आहे. २००८ मध्ये सरकारी बँकांची थकीत कर्जे ४० हजार कोटी होती. ती ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत ३ लाख ६१ हजार कोटी झाली आहेत.हे धक्कादायक वास्तव औरंगाबादच्या बँकिंग एज्युकेशन, ट्रेनिंग व रिसर्च अकादमीने (बेट्रा) प्रकाशित केलेल्या २१ पानी पुस्तिकेवरून उघड झाले आहे. १९९२-९३ ते २००३-०४ पर्यंत थकीत कर्जाची रक्कम ३९ हजार कोटी ते ५६ हजार कोटी दरम्यान होती. त्यानंतर त्यात घट होऊन २००७-०८ थकीत कर्ज ४० हजार ४५२ कोटी झाले होते. २००८ नंतर थकीत कर्ज झपाट्याने वाढू लागले व २०११ नंतर त्यात दरवर्षी ६० हजार ते ७० हजार कोटी रुपयांची भर पडत आहे. अशातऱ्हेने ३१ डिसेंबर 2२०१५ रोजी थकीत कर्ज ३,६१,००० कोटींवर पोहचले आहे.सर्वच बँकांना फटकाथकीत कर्जवाढीचा फटका सर्वच बँकांना बसला आहे. ३१ डिसेंबर २०१५ रोजी विविध बँकांचे एकूण थकीत कर्ज ३,६१,७३१ होते. (कोटी रु.)१. अलाहाबाद बँक ९,६११ २. आंध्रा बँक ९,०५१ ३. बँक आॅफ बडोदा २७,३५४४. बँक आॅफ इंडिया ३२,९९५ ५. बँक आॅफ महाराष्ट्र ९,४७९ ६. कॅनरा बँक १४,८७२ ७. सेंट्रल बँक आॅफ इंडिया १७,५६४ ८. कॉर्पोरेशन बँक ९,७६० ९.देना बँक ७,६७३ १०. आयडीबीआय बँक १६,७३२ ११. इंडियन बँक ५,५९९ १२. इंडियन ओव्हरसीज बँक १९,०५३ १३. ओरिएंटल बँक आॅफ कॉमर्स १०,०३११४. पंजाब अँड सिंध बँक ३,३९१ १५. पंजाब नॅशनल बँक २६,५०१ १६. सिंडीकेट बँक ७,४८१ १७. युको बँक१५,४८१ १८. युनियन बँक आॅफ इंडिया १६,०९८ १९. युनायटेड बँक आॅफ इंडिया ६,११२ २०. विजया बँक ४,०१२ २१. स्टेट बँक आॅफ बिकानेर अँड जयपूर३,०७९ २२. स्टेट बँक आॅफ हैद्राबाद५,८३२ २३. स्टेट बँक आॅफ इंडिया७२,८७१ २४. स्टेट बँक आॅफ म्हैसूर२,९१५२५. स्टेट बँक आॅफ पतियाळा ५,७८९ २६. स्टेट बँक आॅफ त्रावणकोर२,३८४ (हे कर्ज गेल्या तीन वर्षात दोन लाख कोटी रुपयांनी वाढले आहे.)