शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

Tirupati Devasthan: अखेर तिरुपती देवस्थानची माघार; शिवरायांची मूर्ती असलेल्या गाड्यांना प्रवेश; खासदार बंडू जाधवांनी केली मध्यस्थी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2022 12:56 PM

'तिरूपती बालाजी मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती घेऊन जाण्यास कोणतीही अडचण येणार नाही.'-खासदार संजय जाधव

Tirupati Balaji Temple: गेल्या काही दिवसांपासून आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी देवस्थान चर्चेत आले आहे. चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील एक व्यक्ती तिथे गेला असता, त्याच्या गाडीमध्ये लावलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhtrapati Shivaji Maharaj) स्टिकर/मूर्ती काढायला लावली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रातील लोकांकडून तिरुपती देवस्थानाबद्दल प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. पण, आता अखेर तिरुपती बालाजी देवस्थानाने माघार घेतली असून, यापुढे शिवरायांची मूर्ती घेऊन जाण्यास परवानगी देण्यात आली आहे.

संबंधित बातमी- 'तिरुपती देवस्थानचा आदर, पण छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी दैवत आहेत'

आंध्रप्रदेशमधील प्रसिद्ध तिरूपती बालाजी मंदिरात प्रवेश करताना यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती घेऊन जाण्यास कोणतीही अडचण येणार नाही, अशी माहिती परभणीचे शिवसेना खासदार संजय उर्फ बंडू जाधव (MP Sanjay Jadhav) यांनी दिली. खासदार संजय जाधव सध्या बालाजी मंदिरात दर्शनासाठी गेले असून, त्यांनी तिथल्या प्रशासनाशी चर्चा केली आणि या वादावर तोडगा काढला. यानंतर मंदिर प्रशासनासोबत एकत्रित पत्रकार परिषद घेवून त्यांनी याबाबत माहिती दिली.

'यापूढे अडवणूक होणार नाही, पण...'मीडियाशी संवाद साधताना खासदार जाधव म्हणाले, 'मी मागील 3 दिवसांपासून तिरुमला तिरुपती मंदिरात आहे. व्यास महाराजांचे कथा/किर्तन ऐकण्यासाठी आलो होतो. मंदिराचे मुख्य विश्वस्त ए.व्ही.धर्मा रेड्डी हेदेखील उपस्थित होते. चार दिवसांपूर्वी मी एक फेसबूक पोस्ट बघितली. त्याबाबत देखील मी रेड्डी यांच्याशी चर्चा केली. मात्र अशी कोणतीही अडवणुकीची कृती मंदिर प्रशासनाकडून झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. इथल्या नियमानुसार मंदिराच्या आवारत कोणत्याही राजकीय, सामाजिक पक्षाचा झेंडा, निशाणी, चिन्ह यावर बंदी आहे. मात्र भाविकांकडून गाड्यांत लावण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची, गणपती, हनुमान यांच्या छोट्या मुर्त्यांवर बंदी नाही. त्यामुळे या छोट्या मुर्त्यां गाडीत असल्यास यापुढे देखील मंदिर प्रशासनाकडून कोणतीही अडवणूक होणार नाही,' असे खासदार जाधव यांनी स्पष्ट केले.

'सुरक्षेसाठी सहकार्य करावे'त्यांनी पुढे सांगितले की, 'अखंड हिंदुस्तानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिकृती गाडीत लावण्यावरून जो वाद चिघळला होता त्यावर बैठकीदरम्यान चर्चा झाली. आपण देवी देवतांच्या प्रतिकृती गाडीमध्ये लावतो तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती लावतो यावर तिरुपती तिरूमला देवस्थानचा कुठचाही आक्षेप नाही. तिरुपती तिरूमला ट्रस्टचे म्हणणे फक्त येणाऱ्या भक्तजणांना कुठच्याही प्रकारची हानी होऊ नये, सुरक्षिते करता जे काही प्रश्न विचारण्यात येतील त्यांना महाराष्ट्रातील आणि संपूर्ण भारतातील जनतेला सहकार्य करावं एवढेच अपेक्षित आहे,' असेही जाधव म्हणाले. 

टॅग्स :tirupati-pcतिरुपतीtirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाटShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजSanjay Jadhavसंजय जाधव