मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकार अधिवेशन पुढे ढकलत असल्यावरून टीका, शिवीगाळ केली होती. यावर शिंदे सरकारचे मंत्री उदय सामंत यांनी मनात आले की विधिमंडळाचे अधिवेशन घेता येत नाही, असे म्हटले आहे. जरांगे यांनी वक्तव्य केले त्यामुळे आम्ही नाराज नाही कारण त्यांनी एक आंदोलन उभे केले आहे. त्यांनी तब्येतीची काळजी घेऊन आंदोलन करावे, असा सल्ला दिला आहे.
शिवसेनेचे उद्या दुपारी अधिवेशन आहे. यायला लागतंय या टॅगलाईन खाली हे अधिवेशन असणार आहे. शिवदूतची स्थापना या अधिवेशनात केली जाणार आहे. बाळासाहेब ठाकरे हे कोल्हापुरात येऊन आईंचा आशीर्वाद घेऊन प्रचार शुभारंभ करायचे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन होणार आहे. कोल्हापुरातील अधिवेशनात कोणाकोणाचे पक्ष प्रवेश होतात ते पाहा, असे सामंत म्हणाले.
राज्यसभेची निवडणूक लागली तर आमच्या बाजूने भरत गोगावले यांचाच व्हिप लागू होईल. त्याठिकाणी दाखवून मतदान करायचे असते, तर झाले नाही तर तिथेच कार्यक्रम होणार, असा इशारा सामंत यांनी दिला आहे. याचबरोबर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघावर दावा आमचाच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. नारायण राणे यांनी जे जरांगे पाटील यांच्याबद्दल वक्तव्य केलेय ते त्यांचे व्यक्तिगत मत आहे, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.