ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ - देशातील स्टेट बँकेच्या ५ सहयोगी बँका SBH /SBM/SBT/SBOP/SBBJ बंद करून स्टेट बँकेत
विलीन करण्याविरोधात आज व उद्या ( १२ व १३ जुलै) रोजी बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. केंद्र सरकारचा हा आदेश पार्लमेंट व क़ायदा पायदळी तुड़वून झाल्याचा आरोप बँक कर्मचारी संघटनेने केला आहे.
बुड़ित कर्ज वसुल केल्यास बँका सुरळीत चालतील. सरकार व आरबीआय मोठया कारपोरेटना क़र्ज़ माफ़ी देत आहे. त्यामुळे बँका बंद करुन मग त्यांचे विलीन करणे, नंतर खाजगी करण करणे, देश हिताचे नाही, असे संघटनेचे म्हणणे आहे.
सर्व राजकिय पक्षाँचे प्रमुख नेते व सर्व कामगार संघटनांचे प्रमुख नेते यांच्या सहकार्याने दोन दिवसांचे आंदाेलन सुरू आहे. AIBEA व AIBOA सर्व नेते व सर्व बँकामधुन मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी १२ जुलैला आझाद मैदानात दुपारी १२.३० वाजता आंदोलनात सामील व्हावे, असे आवाहन संघटनेचे जनरल सेक्रेटेरी विश्वास उटगी यांनी केले आहे.