शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

जेएनपीटीतील चौथ्या कंटेनर टर्मिनलचे आज भूमिपूजन

By admin | Published: October 11, 2015 2:09 AM

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट येथील चौथ्या कंटेनर टर्मिनल्सचे भूमिपूजन रविवार, ११ आॅक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या प्रकल्पासाठी ७९१५ कोटी रुपयांचा

मुंबई : जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट येथील चौथ्या कंटेनर टर्मिनल्सचे भूमिपूजन रविवार, ११ आॅक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या प्रकल्पासाठी ७९१५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, तो दोन टप्प्यांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. हे टर्मिनल मार्गी लागल्यास वर्तमान क्षमतेपेक्षा १३0 दशलक्ष टन क्षमता वाढणार असून, हे बंदर भारतातील पहिल्या क्रमांकाचे ठरणार आहे.नौकावहन मंत्रालयाचे सचिव राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. हे टर्मिनल खाजगी सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. बंदरापासून कंटेनर डेपोपर्यंतची लांबी २ किलोमीटर राहणार असून, यामुळे क्रेन स्थापन करणे सोपे होणार आहे. तसेच यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणद्वारे ४६ किलोमीटर लांबीचा रस्ता विकसित करण्यात येत असल्याचेही कुमार यांनी सांगितले.प्रकल्पाचा पहिला टप्पा २0१७पर्यंत पूर्ण होऊन दुसरा टप्पा २0२२पर्यंत पूर्ण होणार आहे. दोन्ही टप्पे पूर्ण झाल्यानंतर बर्थची एकूण लांबी २ हजार मीटर राहील. पहिल्या टप्प्यातील १ हजार मी. लांबीच्या रस्त्यामध्ये जमीन सुधारणा, क्वे आणि इतर सोयी डिसेंबर २0१७पर्यंत पूर्ण होतील. तर दुसऱ्या टप्प्यातील प्रलंबित कामे डिसेंबर २0२२पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)रस्ते वाहतूक समस्या होणार दूरसध्याच्या रस्ते वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी बंदर प्रशासनाने स्टेट हायवे ५४ आणि नॅशनल हायवे ४ बी विस्तारित करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा करार एसपीव्ही कंपनी मुंबई आणि जेएनपीटी पोर्ट रोड रेल कंपनी मर्यादित यांच्यामध्ये झाला आहे. या हायवेची एकूण लांबी ४३.९१२ किलोमीटर असणार असून, या प्रकल्पासाठी २९३६ इतका खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पामध्ये ३ मोठे, १२ मध्यम पूल, ७ फ्लायओव्हर, १ एलिव्हेटड कॉरिडॉर आणि ८ रस्त्यांवरील पुलांचा समावेश आहे.