लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शहर-उपनगरांतील लोकल सेवा वक्तशीर करण्यासाठी मध्य रेल्वेवर विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरील ठाकुर्ली स्थानकाजवळील फाटकाच्या ठिकाणी ओव्हर ब्रिजचे गर्डर टाकण्यासाठी सहा तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर अंबरनाथ-बदलापूर स्थानकांदरम्यान असलेल्या पुलाच्या दुुरुस्तीसाठी मरेकडून ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेवर नाइट ब्लॉक असून हार्बर मार्गावर ब्लॉक रद्द केल्यामुळे हार्बरच्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.ठाकुर्ली स्थानकाजवळील रेल्वे फाटकाच्या जागी ब्रिजसाठी चार गर्डर उभारण्यात येणार आहेत. या कामांमुळे डोंबिवली-कल्याण दरम्यान अप-डाऊन धिम्या आणि जलद तसेच पाचव्या-सहाव्या रेल्वे मार्गिकेवर विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळी ९.१५ ते दुपारी ३.१५ वाजेपर्यंत, अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ९.१५ ते दुपारी १२.४५ वाजेपर्यंत ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. त्याचबरोबर पाचव्या-सहाव्या मार्गिकेवरदेखील सकाळी ९.१५ ते ३.१५ वाजेपर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे. ठाकुर्ली स्थानकातील अप-डाऊन दिशेची वाहतूक सकाळी ९ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत बंद राहणार आहे.अंबरनाथ-बदलापूर दरम्यान पुलाच्या दुरुस्तीसाठी अप-डाऊन मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी अंबरनाथ ते वांगणी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ९.३० ते दुपारी २ वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. दरम्यान, सीएसएमटी ते अंबरनाथ, सीएसएमटी ते कसारा, आसनगाव आणि टिटवाळ्याकरिता डाऊन जलद मार्गावरील वाहतूक दुपारी १२ वाजता सुरू करण्यात येईल, तर अप जलद मार्गावरील वाहतूक दुपारी १२.४५ नंतर सुरू होणार आहे.लांब पल्ल्याच्या ट्रेनलाही फटकारविवारी मुंबईत येणाऱ्या पुणे-सीएसटी डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, मनमाड सीएसटी पंचवटी एक्स्प्रेस, मनमाड-एलटीटी गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आलेल्या आहेत. नागपूर-सीएसटी सेवाग्राम एक्स्प्रेस रविवारी नाशिक रोडपर्यंत चालविण्यात येणार आहे. तसेच मुंबईत दाखल होणाऱ्या काही मेल-एक्स्प्रेस गाड्या कल्याण स्थानकात जादा वेळ थांबणार आहेत. यात हावडा-मुंबई एक्स्प्रेस, राजेंद्रनगर-एलटीटी एक्स्प्रेस, गोरखपूर-सीएसटी एक्स्प्रेस, अहालाबाद-एलटीटी स्पेशल ट्रेन, वाराणसी-एलटीटी एक्स्प्रेस, जालना-दादर जनशताब्दी एक्स्प्रेस, हटिया-एलटीटी एक्स्प्रेस, वाराणसी-सीएसटी महानगरी एक्स्प्रेस, अलाहाबाद-एलटीटी दुरांतो एक्स्प्रेस, पाटलीपुत्र-एलटीटी एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश आहे.दिवा स्थानकात अतिरिक्त थांबा : विशेष ब्लॉकमुळे डाऊन मार्गावरील काही मेल-एक्स्प्रेस गाड्यांना दिवा स्थानकात अतिरिक्त थांबा देण्यात येणार आहे. यामध्ये सीएसटी-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस, सीएसटी-नागरकोविल एक्स्प्रेस, एलटीटी-काकिनाडा पोर्ट, सीएसटी-हैदराबाद एक्स्प्रेसचा समावेश आहे. तर एलटीटी-गोरखपूर, सीएसटी-हावडा या गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.कर्जत-पनवेल-दिवा मार्गे रेल्वे वाहतूकमध्य रेल्वेवरील विशेष ब्लॉकमुळे अप मेल एक्स्प्रेसची वाहतूक कर्जत-पनवेल-दिवा मार्गे वळवण्यात येणार आहे. यात काकिनाडा पोर्ट-एलटीटी, कोल्हापूर-सीएसटी मुंबई सह्याद्री, हैदराबाद-सीएसटी, चेन्नई-सीएसटी, कोईम्बतूर-एलटीटी या एक्स्प्रेसचा समावेश आहे. बदलापूर, कर्जतच्या प्रवाशांची कसरत१अंबरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान चिखलोली गावातील नाला धोकादायक झाल्याने, रेल्वे रुळाखालून पाणी वाहून जाण्यासाठी नाला बांधाण्याचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी रेल्वेने रविवारी साडेचार तासांचा ट्रॅफिक ब्लॉक घेतला आहे. या कालावधीत एकही लोकल धावणार नसल्याने प्रवाशांचे हाल होणार आहेत. रेल्वेसेवा ठप्प होणार असतानाही, कोणतीही पर्यायी व्यवस्था बदलापूरहून केलेली नाही. २अंबरनाथ-बदलापूर दरम्यान हा ब्लॉक असल्याने, बदलापूरकरांना ठाणे, मुंबई गाठण्यासाठी इतर पर्यायी वाहतूक साधनांचा वापर करावा लागणार आहे. बदलापूरहून कर्जतला जाण्यासाठी शटलसेवा असेल. बदलापूर ते कर्जत-खोपोलीपर्यंत लोकल चालविण्यात येणार आहे, तर अंबरनाथ ते कल्याणपर्यंतही शटल सेवा सुरू राहाणार आहे. मात्र, कर्जत, बदलापूरच्या प्रवाशांना मुंबई गाठण्यासाठी कसरत करावी लागेल. केडीएमटी सज्जडोंबिवली शहरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी ठाकुर्ली रेल्वेस्थानकानजीक उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. या पुलाचा गर्डर टाकण्यासाठी मध्य रेल्वेतर्फे रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन सेवेने (केडीएमटी) सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत डोंबिवली-कल्याणदरम्यान विशेष बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. डोंबिवली पूर्वेला स्थानकाबाहेरील डॉ. राथ रोडहून केडीएमटीच्या बस सुटतील. तसेच या मार्गावर बसच्या ३३ फेऱ्या होतील, अशी घोषणा परिवहन समितीचे सभापती संजय पावशे यांनी दिली. रेल्वेस्थानक परिसर कोंडीमुक्त राहील, यासाठी विशेष पोलीस तैनात करण्यात येणार आहेत, असे डोंबिवली शहर वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक गोविंद गंभीरे यांनी सांगितले.
आज मध्य रेल्वेवर ‘ब्रिज-स्पेशल’ ब्लॉक
By admin | Published: June 25, 2017 2:15 AM