पुणो : मराठीतील वैशिष्टय़पूर्ण साहित्यकृतींचा सन्मान करण्यासाठी सुरू केलेल्या ‘लोकमत साहित्य पुरस्कार’ योजनेसाठी पुस्तके पाठवण्याचा आजचा (रविवार, 1क् ऑगस्ट) अखेरचा दिवस आहे.
सारस्वतांच्या गौरवासाठी ‘लोकमत’ या महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाच्या दैनिकाने या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली आहे. मराठी साहित्यनिर्मितीला चालना मिळावी, या हेतूने हे पुरस्कार दिले जात आहेत. या पुरस्काराचे हे तिसरे वर्ष आहे.
या पुरस्कारासाठी लेखक, प्रकाशक पुस्तके पाठवू शकतात. 1 एप्रिल 2क्13 ते 31 मार्च 2क्14 दरम्यान प्रसिद्ध झालेली पुस्तके यासाठी ग्राह्य धरण्यात येतील. पुस्तकावर ‘लोकमत साहित्य पुरस्कारासाठी’ असे नमूद करावे.
पुरस्कारासाठी साहित्यातील कथा, कादंबरी, कविता, ललित गद्य, बालसाहित्य, चरित्र-आत्मचरित्र व वैचारिक हे सात विभाग विचारात घेतले जातील.
याशिवाय या वर्षीपासून अनुवाद व विज्ञान या दोन साहित्यप्रकारांचाही नव्याने समावेश करण्यात आला आहे. मुखपृष्ठासाठी चित्रकाराचा सन्मान करण्यात येईल. तसेच, मागील वर्षीप्रमाणो याही वर्षी एका प्रतिभावंत साहित्यिकाला ‘जीवनगौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येणार आहे.
पुस्तके खालील पत्त्यावर पाठवावीत : लोकमत मीडिया प्रा. लि., व्हीया वेंटेज, लॉ कॉलेज रोड, एरंडवणो, पुणो 411क्क्4 (प्रतिनिधी)