मिरज : मिरजेतून सोमवारी सायंकाळी १० टँकरची आठवी ‘जलदूत’ एक्स्प्रेस लातूरला रवाना झाली. लातूरला पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था पूर्ण झाल्याने मंगळवारी १० व २५ टँकरच्या दोन एक्स्प्रेस साडेसतरा लाख लीटर पाणी घेऊन लातूरला जाणार आहेत. लातूरसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या व्यवस्थेची जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी पाहणी केली. १० टँकरची आठवी जल एक्स्प्रेस सायंकाळी ५.४० वाजता रवाना झाली. आतापर्यंत लातूरकरांसाठी ४० लाख लीटर पाणी पाठविण्यात आले आहे. मिरजेतील जलशुद्धीकरण केंद्रापासून रेल्वे यार्डापर्यंतच्या जलवाहिनीचे काम पूर्ण झाले आहे. हैदरखान विहिरीत पाण्याचे झरे!नदीतील पाण्याचा साठा करण्यासाठी हैदरखान विहिरीतील पाण्याचा उपसा करून तो ओढ्यात सोडण्यात येणार आहे. उपसा झाल्यानंतर विहिरीच्या चोहोबाजूंच्या झऱ्यातून पाणी वाहत होते. विहिरीतील पाण्याच्या नमुन्याचीही तपासणी केल्यानंतर नदीचे पाणी विहिरीत सोडण्यात आले. (वार्ताहर)
मिरजेतून आज लातूरला दोन ‘जलदूत’ जाणार
By admin | Published: April 19, 2016 4:08 AM