नागपूर/मुंबई : ‘दूध संकलन बंद’ आंदोलनाला दुसऱ्या दिवशीही पश्चिम महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळाला. दूध पट्ट्यातील सात जिल्ह्यांमध्ये खूपच कमी संकलन झाले. त्यामुळे बुधवारी मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये दुधाची टंचाई जाणवू शकेल. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत तोडगा निघाला नाही. बुधवारी पुन्हा सर्वपक्षीय बैठक होणार आहे, त्यात निर्णय होण्याची शक्यता आहे.नेहमीच्या तुलनेत मंगळवारी मुंबईतील दूध संकलन निम्म्यावर आल्याने, मागणीच्या तुलनेत काही प्रमाणात तुटवडा जाणवणार आहे. आंदोलन कायम राहिल्यास गुरुवारपासून मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात दुधाच्या तुटवड्याचा सामना करावा लागणार आहे. विक्रोळी येथील दूध विक्रेते सुनील अंगाणे यांनी सांगितले की, अहमदनगरमधून येणारे दूध मंगळवारी कमी प्रमाणात आले. उद्या टॅँकर येण्याची शक्यता कमी आहे.मुंबई, ठाणे, नवी मुंबई या महानगरांना अजून मोठा फटका बसलेला नसला, तरी पुण्यात दूधटंचाई जाणवली. कात्रजकडे दररोज सव्वादोन लाख लीटर संकलन होते. मंगळवारी निम्मेच झाले. त्यामुळे गुरुवारपासून टंचाई जाणवू शकते,असे पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ.विवेक क्षीरसागर यांनी सांगितले. बुधवारी संकलनात अडथळे आल्यास, टंचाई भासेल, असे श्रीकृष्ण चितळे म्हणाले. त्यामुळे लोकांनी अधिक दुधाचा साठा करायला सुरुवात केली आहे.औरंगाबाद व परभणी जिल्हा वगळता, मराठवाड्यात मंगळवारी दुसºया दिवशी दूध दरवाढीसाठीचे आंदोलन सुरू होते. अनेक ठिकाणी वाहने जाळण्यात आली, दूध फेकण्यात आले.>मुंबई-ठाण्याचा पुरवठा घटलाराज्यातील दूधबंद आंदोलनाचा फटका मुंबईकरांना प्रत्यक्षात बुधवारपासून जाणवण्याची शक्यता आहे. नेहमीच्या तुलनेत मंगळवारी मुंबईतील दूध संकलन निम्म्यावर आल्याने, मागणीच्या तुलनेत काही प्रमाणात तुटवडा जाणवणार आहे. आंदोलन कायम राहिल्यास गुरुवारपासून मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात दुधाच्या तुटवड्याचा सामना करावा लागणार आहे. ठाण्यातही काहीशी अशीच स्थिती आहे, येथे मंगळवारी दूध संकलनात २० टक्क्यांची तूट होती.दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे सोमवारपासून मुंबईत नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, मराठवाडा आणि गुजरातमधून पोलीस बंदोबस्तात दूध पुरविण्यात येत आहे. नवी मुंबईतील संकलन केंद्रात दुधाचे टँकर पोलीस बंदोबस्तात आणण्यात आले. मात्र, ग्रामीण भागातून त्या ठिकाणी येणारे संकलन थंडावले आहे. त्याचा परिणाम बुधवारपासून जाणवणार आहे. आरेतील दूध डेअरीतून दररोज ८ हजार लीटर दुधाचा पुरवठा वांद्रे आणि दहिसर भागात पुरविला जात आहे. सध्या ३४ हजार लीटर दूध शिल्लक असल्याचे आरे दूध डेअरीचे व्यवस्थापक बी.एन. बोरसे यांनी सांगितले.>कुठे झाले किती दूध संकलन?जिल्हा रोजचे मंगळवारचे दूध पडून नुकसान(लाख ली.) (लाख ली.) (लाख ली.) (कोटी रु.)कोल्हापूर १६ ७.५८ ८.४२ ०३सांगली १४.८५ ०२.८५ १२ ४.२०सातारा २३.५८ ०२.७१ २०.८७ ७.३०सोलापूर १२ ०.१० ११.९० ४.२४अहमदनगर २४ ०३ २१ ७.४८पुणे ३० १५ १५ ५.३४
आज जाणवेल दूधटंचाई, भीतीपोटी लोकांनी खरेदी वाढविली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 6:37 AM