शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

आज तरी आमची आघाडी कायम आहे, शरद पवारांचे सूचक वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 7:32 AM

शिवसेनेसोबतच्या महाविकास आघाडीला आमचा पाठिंबा असून तो भविष्यातही कायम राखण्याची आम्हाला इच्छा आहे असे सूचक उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढले.

नवी दिल्ली : आज तरी आमची आघाडी कायम आहे. काँग्रेस, शिवसेनेसोबतच्या महाविकास आघाडीला आमचा पाठिंबा असून तो भविष्यातही कायम राखण्याची आम्हाला इच्छा आहे, असे सूचक उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढले. शिवसेनेमध्ये झालेल्या बंडाशी संबंधित विविध प्रश्नांना शरद पवार यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत रविवारी उत्तरे दिली. ते म्हणाले की, शिवसेनेच्या आमदारांचा एक गट सध्या आसाममध्ये असून त्यांना महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन हवे आहे. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, गुवाहाटीमध्ये गेलेले शिवसेनेचे आमदार महाराष्ट्रात परत आल्यानंतर त्यांच्या भूमिकेत निश्चित बदल होईल. महाराष्ट्र विकास आघाडीला संपूर्ण पाठिंबा देण्याची राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची भूमिका कायम आहे.

गुवाहाटीतून मुंबईत या, संख्याबळ सिद्ध करासुमारे ५० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे करत आहेत. त्यांच्यावर टीका करताना शरद पवार म्हणाले की, आपल्याला किती आमदारांचा पाठिंबा आहे हे एका नेत्याकडून वारंवार सांगितले जात आहे. इतके पाठबळ असेल तर ते नेते व त्यांचे आमदार इतके दिवस गुवाहाटीमध्ये काय करत आहेत?  मला त्यांच्या या कृतीचे आश्चर्य वाटते. या नेत्याने मुंबईत येऊन राज्यपालांकडे किंवा कोणत्याही लोकशाही व्यवस्थेकडे जाऊन आपल्याकडे असलेली सदस्यसंख्या आहे, हे सिद्ध केले पाहिजे.

राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाहीमहाराष्ट्रात निर्माण झालेल्या अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता शरद पवार यांनी फेटाळून लावली आहे. ते म्हणाले की, शिवसेनेच्या ज्या लोकांनी बंडखोरी केली आहे, त्यांची महाराष्ट्रामध्ये दुसरे सरकार यावे, अशी इच्छा आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केल्यास या बंडखोर आमदारांना एका ठिकाणाहून  दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी ज्या लोकांनी मेहनत घेतली, त्यांच्या स्वप्नांना सुरुंग लागेल. समजा राष्ट्रपती राजवट लागू झाली तर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका घ्याव्या लागतील. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीNCPराष्ट्रवादी काँग्रेस