मुंबई - नवा गणवेश.. नवे दप्तर.. नव्याकोऱ्या वह्यांचा सुगंध...अशी जय्यत तयारी करून मे महिन्याच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर शुक्रवारी विद्यार्थी शाळेत जाणार आहेत. विदर्भ वगळता आजपासून राज्यभरातील शाळांमध्ये पहिली घंटा वाजणार असून विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा होणार आहे.पहिल्या दिवसाची सुरुवात चांगली झाली तर विद्यार्थ्यांच्या गुणात्मक वाटचालीला गती मिळेल, या हेतूने नव्या शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस उत्सवरूपी साजरा करण्यात यावा, अशा सूचना शिक्षण विभागाने याआधीच शाळांना दिल्या आहेत. त्यानुसार शाळेच्या पहिल्या दिवशी फूल देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत, मोफत पुस्तक वितरण आदी कार्यक्रम होणार आहेत. तसेच पहिल्या दिवशीच्या माध्यान्ह भोजनात गोड पदार्थांचा समावेश करावा, अशा सूचनाही शिक्षण विभागाने शाळांना दिल्या आहेत.
आजपासून शाळेची घंटा वाजणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 6:45 AM