डोंबिवली : रूळ तसेच तांत्रिक देखभालीच्या कामासाठी ट्रान्स-हार्बर मार्गावरील नेरूळ-वाशी स्थानकांदरम्यान गुरुवार आणि शुक्रवारी दुपारी १२.३५ ते दुपारी २.०५ वाजेपर्यंत विशेष ट्रॅफिकब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत ११ अप आणि ११ डाउन अशा २२ लोकलसेवा रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे ट्रान्स-हार्बर मार्गावरील प्रवाशांना त्याचा फटका बसणार आहे. ब्लॉकच्या कालावधीत ट्रान्स-हार्बरच्या प्रवाशांना मुख्य तसेच हार्बरमार्गे प्रवासाची मुभा असल्याचे मध्य रेल्वेने जाहीर केले आहे.ठाणे-वाशीदरम्यानच्या दुपारी १२.१२, १२.४०, १.०१, १.२५, १.५७, तर ठाणे-नेरूळदरम्यानच्या दुपारी १२.२०, १.१० आणि १.३७, ठाणे-पनवेलदरम्यानच्या दुपारी १२.५२, १.१८ आणि २.०५ आदी लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.वाशी-ठाणेदरम्यानच्या दुपारी १२.२१, १२.४९, १.१८, १.४०, २.०२ या लोकल, नेरूळ-ठाणे दरम्यानच्या दुपारी १२.१०, १२.३१, ०१.००, ०१.५० तर पनवेल-ठाणेदरम्यानच्या दुपारी १२.१८ आणि १.०४ या लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)- २२ फेऱ्या होणार रद्द; वाशी-नेरूळ मार्गांवर देखभालीचे काम
ट्रान्स-हार्बरवर आज, उद्या विशेष ट्रॅफिकब्लॉक
By admin | Published: April 13, 2017 12:34 AM