वसई : महानगरपालिकेच्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीची राजकीय पक्षांसह निवडणूक यंत्रणेने पूर्ण तयारी केली आहे. उद्या (दि.१४) एकूण ६२० मतदान केंद्रांवर ६ लाख ८७ हजार मतदार १११ नगरसेवक निवडणार आहेत. यासाठी निवडणूक यंत्रणेने ३ हजार ४६१ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. पावसाचे वातावरण लक्षात घेता मतदान प्रक्रियेत काही प्रमाणात अडथळे येण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने निवडणूक यंत्रणेने तयारी केली आहे.प्रचारापासून शनिवारी कार्यकर्त्यांना विश्रांती मिळाली. परंतु आता मतदानाची तयारी करण्याची कामे हातावेगळी करण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाच्या विविध कार्यालयांत कार्यकर्ते मोठ्या संख्येने कामाला लागले आहेत. रविवारी सकाळी ७.३० वाजता मतदानास सुरुवात होणार आहे. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. मतदान झाल्यानंतर प्रभागनिहाय मतदानाची टक्केवारी एकत्र करून १११ प्रभागांत किती टक्के मतदान झाले, ते जाहीर होणार आहे. मतदानाच्या दिवशी अप्रिय घटना घडू नये, याकरिता पोलिसांनीही खबरदारीचे उपाय योजले आहेत. मतदानाकरिता पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागविली आहे. १६ जून रोजी मतमोजणी होणार असून, त्या दिवशी सत्तेचे दावेदार वसई-विरारकरांना समजतील.
आज वसई-विरार निवडणूक
By admin | Published: June 14, 2015 1:55 AM