शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

आज जायकवाडीत पाणी!

By admin | Published: November 03, 2015 3:03 AM

नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरण समूहातून सोडलेल्या विसर्गापैकी नाशिकचे पाणी जायकवाडीकडे झेपावले आहे, तर अहमदनगर धरणसमूहातील पाणी अद्याप

औरंगाबाद/नाशिक/नगर : नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरण समूहातून सोडलेल्या विसर्गापैकी नाशिकचे पाणी जायकवाडीकडे झेपावले आहे, तर अहमदनगर धरणसमूहातील पाणी अद्याप प्रवरेत दाखल झाले नसून या पाण्यास जायकवाडीत दाखल होण्यास निर्धारित वेळेपेक्षा १६ तास उशीर होण्याची शक्यता आहे. नाशिकच्या गंगापूर धरणातून दुपारी पाणी सोडण्यास सुरुवात झाली, मात्र शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर संध्याकाळी धरणाचे दरवाजे पुन्हा बंद करण्यात आले. सोमवारी मुळा धरणातून ५,६८४ क्युसेस, निळवंडे २,०००, दारणा ४,०००, मुकणे १,००० व कडवा ३,००० क्युसेस असा विसर्ग करण्यात येत होता. यापैकी नाशिक जिल्ह्यातील दारणा, मुकणे व कडवा धरण समूहातून सोडलेले पाणी नांदुर मधमेश्वर प्रकल्पातून सोमवारी दुपारी १२ वाजता गोदावरीच्या पात्रात दाखल झाले. एकत्रितपणे नांदूर-मधमेश्वरमधून ४७६९ क्युसेस असा विसर्ग होत असल्याने गोदावरीतून पाणी जायकवाडीकडे झेपावले आहे. हे पाणी मंगळवारी दुपारी २ वाजेपर्यंत जायकवाडी धरणात येऊन धडकणार आहे, असे जायकवाडी धरण नियंत्रण कक्षातून अभियंता अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.मुळा धरणातून सोडलेले पाणी सोमवारीप्रवरेच्या पात्रात दाखल झाले आहे, तर निळवंडे धरणातून सोडलेले पाणी ओझर वेअरपर्यंत आले असून ओझर वेअर रिकामा केल्याने जोपर्यंत तो भरत नाही तोपर्यंत तेथून पुढे पाणी प्रवरेत येणार नसल्याचे प्रशासनाने सोमवारी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)नाशिकमध्ये पाणी सोडले, पाणी रोखले...नाशिकमध्ये रविवारी रात्रीच्या आंदोलनानंतर गंगापूर धरणातून पाणी सोडण्यास स्थगिती देण्यात आली. सोमवारी कडेकोट बंदोबस्तात दुपारी बारा वाजता पाचशे क्युसेक पाणी सोडण्यासाठी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. मात्र दुपारी सर्वपक्षीय कृती समितीने जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांना घेराव घातल्यानंतर साडेचार वाजता निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून परिस्थितीची जाणीव करून दिली व गंगापूर धरणातून पाणी सोडण्याबाबत शासन पातळीवर चर्चा सुरू असल्यामुळे पाणी सोडणे बंद करण्याची सूचना दिली. त्यानंतर सव्वापाच वाजता पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी गंगापूर धरणाचे दरवाजे पुन्हा बंद केले. प्रवरेत ओझर वेअर ते पैठणदरम्यान १६ बंधारे असून ते सर्व पूर्ण क्षमतेने भरलेले नाहीत. त्यामुळे ते भरल्यानंतरच पाणी पुढे जाईल. नगरमध्ये बंदोबस्तमुळा, भंडारदरा-निळवंडे धरणातून रविवारी रात्री जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आले. त्यासाठी राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन तुकड्यांचे सहा प्लाटून तैनात असून एका तुकडीमध्ये शंभर पोलीस कर्मचारी आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्यास कलम १८८ अन्वये थेट गुन्हे दाखल करण्यात येतील, असे नगरचे पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांनी सांगितले.