शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सस्पेन्स संपला! आदित्य ठाकरेंविरोधात शिंदेंचा उमेदवार ठरला; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
2
मनसेने जाहीर केली सहावी यादी; अशोक चव्हाणांच्या मुलीविरोधात 'हा' उमेदवार मैदानात
3
Maharashtra Election 2024: "...पण काही लोकांबद्दल मला दुःखही आहे", फडणवीस असं का म्हणाले?
4
महायुतीच्या जागावाटपात रिपब्लिकन पक्ष अद्यापही वेटिंगवरच; आठवले नाराज, फडणवीसांनी दिला मोठा शब्द
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत मानसिंगराव नाईक की सत्यजित देशमुख, कोण मारणार बाजी? महाडिक बंडखोरीच्या तयारीत
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, मविआ'ला खोचक टोलाही लगावला
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : इंडिया आघाडीमध्ये फूट? विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव उमेदवार उभे करणार; महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार
8
Maharashtra Election 2024: शरद पवार- एकनाथ शिंदेंच्या 'या' उमेदवारांनी घेतली जरांगेंची भेट
9
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
10
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
11
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
13
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
14
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
15
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
16
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा
17
अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार: बारामती विधानसभा कोणासाठी सोप्पी, आकडे काय सांगतात?
18
स्वरा भास्करच्या पतीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभेचं तिकीट, अभिनेत्री ट्वीट करत म्हणाली...
19
इराण इस्रायलवर हल्ला करणार? सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले,...
20
शरद पवारांकडून मोहोळमध्ये अनपेक्षित धक्का; अनेकांना बाजूला सारत रमेश कदमांच्या मुलीला उमेदवारी!

म्हाडाच्या १ हजार घरांसाठी आज जाहिरात

By admin | Published: April 13, 2015 5:48 AM

म्हाडाच्या यंदाच्या घराच्या सोडतीसाठी अखेर ‘मुहूर्त’ मिळाला आहे. मुंबईतील ९९७ घरांसाठी सोमवारी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे

मुंबई : म्हाडाच्या यंदाच्या घराच्या सोडतीसाठी अखेर ‘मुहूर्त’ मिळाला आहे. मुंबईतील ९९७ घरांसाठी सोमवारी जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. त्याचबरोबर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही गेल्या सहा महिन्यांपासून प्रलंबित राहिलेल्या अंध व अपंग प्रवर्गासाठी आरक्षित ६६ घरांच्या लॉटरीसाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत. येत्या बुधवारपासून म्हाडाच्या संकेतस्थळावर इच्छुकांना अर्जासाठी नोंदणी करता येणार असून, त्यानंतर २१ एप्रिलपासून आॅनलाइन अर्ज भरता येतील. काँग्रेस सरकारच्या काळात म्हाडातील घरांच्या किमतीबाबत ओरड करणारी भाजपा-शिवसेना आपल्याकडे सत्ता असतानाही घराच्या वाढीव किमतीवर नियंत्रण ठेवू शकलेली नाही. उलट गेल्या वेळीपेक्षा यंदा सर्वच उत्पन्न गटातील सदनिका महागड्या आहेत. प्रतीक्षानगरातील ४०.६० चौरस मीटर घरासाठी ३७ लाख ५३ हजार तर गोरेगाव उन्नतनगरातील अत्यल्प उत्पन्न गटासाठीच्या २५ चौरस मीटरच्या घरासाठी १८ लाख १४ हजार रुपये मोजावे लागणार आहेत.सुरुवातीला सदनिकेच्या दर निश्चितीच्या गोंधळामुळे आणि त्यानंतर वांद्रे पोटनिवणुकीसाठीच्या आचारसंहितेमुळे लॉटरीची जाहिरात रेंगाळली होती. शनिवारी मतदान झाल्याने जाहिरात प्रसिद्ध करण्याचा मार्ग मोकळा झाला. कोकण मंडळाच्या विरारमधील घरांसाठी मात्र डिसेंबरमध्ये स्वतंत्रपणे सोडत घेतली जाणार असल्याचे प्राधिकरणातील सूत्रांकडून सांगण्यात आले. या वर्षीच्या लॉटरीत उच्च उत्पन्न गटातील घरांचा समावेश न करता अत्यल्प, अल्प व मध्यम उत्पन्न गटातील घरांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यासाठी मासिक उत्पन्नाची अट अनुक्रमे १६ हजार, ४० व ७० हजार इतकी आहे.याबाबतची सविस्तर माहिती प्राधिकरणाच्या ६६६. www.mhada.maharashtra.gov.in, www.mhada.gov.in, https://lottery.mhada.gov.in  या संकेतस्थळांवर १५ एप्रिलपासून पाहावयास मिळणार आहे.