संजीव वेलणकर पुणे.
पुणे, दि. 17 - जन्म १५ एप्रिल १९१८
त्यांचे खरे नाव इक्बाल हुसेन होते. मा. हसरत जयपुरी यांनी सगळ्यात जास्त गाणी संगीतकार शंकर जयकिशन यांच्यासाठी केली. बहारों फूल बरसाओ मेरा महबूब आया है' व में 'जिंदगी एक सफर है सुहाना' या गाण्यांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. मा. हसरत जयपुरी यांनी आपल्या कारकिर्दीत 300 हून अधिक चित्रपटात २००० पेक्षा जास्त गीते लिहिली. जयकिशन आणि गीतकार हसरत जयपुरी यांची अभेद्य जोडी होती. हसरतसाहेबांच्या लेखणीतून प्रणयी गीतांचा जणू ओघच चालू असायचा आणि जयकिशन त्या गीतांना अशा काही आकर्षक चाली लावीत, की ऐकणारा बाकीचे सगळे विसरून गीत ऐकत बसयाचा. जयकिशन यांच्या कन्या आणि मुंबईच्या अग्रगण्य फॅशन डिझायनर भैरवी जयकिशन यांनी आपल्या वडिलांचे वर्णन करताना म्हटले आहे की, माझे वडील ज्या पद्धतीने जीवन जगले त्याच्याच आधारे हसरत जयपुरींनी ‘अंदाज’मधील (१९७१) ‘जिंदगी एक सफर है सुहाना, यहा कल क्या हो किसने जाना’ हे शीर्षकगीत लिहिले. मा.हसरत जयपुरी यांचे १७ सप्टेंबर १९९९ रोजी निधन झाले.
लोकमत समुहातर्फे मा.हसरत जयपुरी यांना आदरांजली.
हसरत जयपुरी यांची काही गाणी
‘जीया बेकरार है’
‘पतली कमर है, तिरछी नजर है’
‘मोहब्बत ऐसी धडकन है’
‘आ अब लौट चले’
‘देर ना हो जाये’
‘एहसान तेरा’
‘सायोनारा’
संदर्भ. इंटरनेट