शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
2
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
3
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
4
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
5
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
6
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
7
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
8
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
9
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
10
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
11
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
12
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
13
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
14
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
15
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
16
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
17
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
18
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
19
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
20
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'

संत तुकाराममहाराज पालखीचे आज प्रस्थान

By admin | Published: June 16, 2017 4:42 AM

जगद्गुरू श्री संत तुकाराममहाराज यांच्या पालखी सोहळ्याचे शुक्रवारी दुपारी येथून प्रस्थान होणार आहे. वारकऱ्यांची मांदियाळी आणि हरिनामाने गजबजलेली देहूनगरी

- लोकमत न्यूज नेटवर्क

देहूगाव : जगद्गुरू श्री संत तुकाराममहाराज यांच्या पालखी सोहळ्याचे शुक्रवारी दुपारी येथून प्रस्थान होणार आहे. वारकऱ्यांची मांदियाळी आणि हरिनामाने गजबजलेली देहूनगरी ३३२व्या प्रस्थान सोहळ्यासाठी सज्ज झाली आहे. शुक्रवारी पहाटे पाचला श्रींची महापूजा व शिळामंदिरातील महापूजा पालखी सोहळाप्रमुख व विश्वस्तांच्या हस्ते होईल. सकाळी ५.३० ते ६ दरम्यान पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायणमहाराज समाधीची महापूजा होईल. सहाला विश्वस्त व मनुशेठ वादिया परिवाराच्या हस्ते महापूजा होईल. सकाळी १० ते दुपारी १२ दरम्यान संभाजीमहाराज मोरे यांचे पालखी प्रस्थान सोहळा सप्ताह काल्याचे कीर्तन होणार आहे. सकाळी ९ ते ११ दरम्यान संत तुकाराममहाराजांच्या पादुकांची इनामदार वाड्यात दिलीपमहाराज मोरे इनामदार यांच्या हस्ते महापूजा होईल. त्यानंतर पादुका मुख्य मंदिरात प्रस्थानपूर्व पूजेसाठी आणल्या जातील. दुपारी २.३० च्या सुमारास पालखी प्रस्थान सोहळ्यास सुरवात होईल. सायंकाळी पाचला पालखी मंदिर प्रदक्षिणेसाठी निघेल. सायंकाळी ६.३० वा. पालखी इनामदारवाड्यात पहिल्या मुक्कामाच्या ठिकाणी जाईल. तेथे मुख्य आरती होईल. प्रस्थान सोहळ्यास सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, पालक मंत्री गिरीष बापट यांच्यासह विविध मान्यवर व शासकीय अधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती पालखी सोहळाप्रमुख अभिजित मोरे यांनी दिली. मंदिर व परिसराची स्वच्छता झाली आहे. ३२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संपूर्ण मंदिर परिसरावर नजर आहे. प्रवेशद्वारावर धातूशोधक यंत्र लावण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळपासूनच दिंड्यांना प्रदक्षिणेसाठी मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश देण्यात येणार असून, उत्तर दरवाजाने त्यांना बाहेर पडावे लागणार आहे. - गुुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास बॉम्बनाशक दलाने व श्वान पथकाने मंदिर परिसराची तपासणी केली. या वेळी नेहमीपेक्षा तिप्पट पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. पालखीचा पहिला मुक्काम गावातील देऊळवाड्याशेजारील इनामदारवाड्यात असेल. तेथून शनिवारी (दि. १७) पालखी आकुर्डीकडे रवाना होणार आहे. आकुर्डीहून रविवारी (दि. १८) पालखी सोहळा पुण्याकडे कूच करणार आहे.