मुंबई : मुंबई विद्यापीठांतील कला, वाणिज्य, विज्ञान आणि विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या पदवी अभ्यासक्रम (तेरावी) प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी शनिवारी सायंकाळी जाहीर होणार आहे. यंदा तेरावीसाठी राज्यातून २ लाख ६५ हजार ६३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून वाणिज्य, विज्ञान आणि विविध व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी चुरस रंगणार आहे.मुंबई विद्यापीठाअंतर्गत एकूण ७४० महाविद्यालये आहेत. येथे विद्यापीठाकडून प्रवेशपूर्व आॅनलाईन नोंदणी करून घेण्यात आली. याउलट महाविद्यालयस्तरावर २४ जूनपर्यंत अर्ज विक्री सुरू होती. तर २५ जून रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. या यादीत स्थान पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना २७ जूनपर्यंत कागदपत्रांची छाननी करावी लागणार असून २८ जूनपर्यंत प्रवेश घ्यावा लागणार आहे. तेरावीची दुसरी गुणवत्ता यादी २९ जून आणि तिसरी गुणवत्ता यादी १ जुलै रोजी जाहीर होणार आहे. तर इन हाऊस कोट्यातून प्रवेशाची मुदत शनिवारी संपत आहे. सेल्फ फायनान्सची चलतीपारंपरिक अभ्यासक्रमांच्या तुलनेत यंदाही बीएमएम, बीएमएस, बीएससी आयटी, बीएससी (कम्प्युटर सायन्स), बीकॉम (बँकिंग अँन्ड इन्शुरन्स), बीकॉम (अकाऊंट अँन्ड फायनान्स) या सेल्फ फायनान्स शाखांनाही विद्यार्थ्यांची पसंती मिळत आहे. शिवाय बायो टेक्नॉलॉजी, बायो केमिस्ट्री आणि संगणक शास्त्रच्या पदवीच्या प्रवेशासाठीचा कट आॅफही चांगलाच वाढण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
तेरावी प्रवेशाची आज पहिली गुणवत्ता यादी; प्रवेशासाठी चुरस रंगणार
By admin | Published: June 25, 2016 3:59 AM