शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

‘स्मार्ट सिटी’चे आज भवितव्य

By admin | Published: December 14, 2015 12:24 AM

शहरात गेल्या काही दिवसांपासून गदारोळ सुरू असलेल्या स्मार्ट सिटी आराखड्याचे भवितव्य सोमवारी (दि. १४) ठरणार आहे. स्मार्ट सिटी आराखड्याबाबत मुख्यसभेच्या विरोधात

पुणे : शहरात गेल्या काही दिवसांपासून गदारोळ सुरू असलेल्या स्मार्ट सिटी आराखड्याचे भवितव्य सोमवारी (दि. १४) ठरणार आहे. स्मार्ट सिटी आराखड्याबाबत मुख्यसभेच्या विरोधात जाऊन राज्य शासनाकडून आयुक्तांनी आणलेले निर्देश, स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही), औंध-बाणेर या विकसित भागाचाच रोल मॉडेल म्हणून विकास, नगरसेवकांना विश्वासात न घेता तयार केलेला आराखडा आदी मुद्यांवरून नगरसेवक, आयुक्त कुणाल कुमार यांना घेरण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसकडून स्मार्ट सिटी आराखड्याला विरोध नाही; मात्र स्वायत्तताही जपली पाहिजे, अशी भूमिका घेतली गेल्याने आराखडा फेटाळला जाण्याची टांगती तलवार अद्याप कायम आहे. केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठीच्या आराखड्याला अंतिम मंजुरी देण्याचा प्रस्ताव मुख्य सभेसमोर आला असता, हा विषय ४ जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.यामुळे स्मार्ट सिटी स्पर्धेतील पुण्याचा सहभाग धोक्यात आल्याने आयुक्त कुणाल कुमार यांनी राज्य शासनाने दरवाजे ठोठावून मुख्यसभेला निर्णय बदलण्यास भाग पाडले आहे. त्यानुसार सोमवार, १४ डिसेंबर रोजी मुख्यसभा घेतली जात आहे. आयुक्तांनी मुख्यसभेच्या भावनांचा आदर न करता राज्य शासनाकडे धाव घेतल्याने मनसे, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक कमालीचे दुखावले गेले आहेत.स्मार्ट सिटी आराखडा मंजूर व्हावा यासाठी कुणाल कुमार यांच्याकडून मोठे प्रयत्न करण्यात येत आहेत. स्मार्ट सिटीबाबचे आक्षेप दूर करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षाच्या पक्षश्रेष्ठींकडे त्यांनी स्मार्ट सिटीला पाठिंबा देण्याची विनंती केली आहे.स्मार्ट सिटी आराखड्याच्या मंजुरीसाठी सोमवारी होत असलेल्या मुख्य सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मनसेच्या सभासदांकडून या विषयाला मोठ्याप्रमाणात उपसूचना दिल्या जाण्याची शक्यता आहे. स्मार्ट सिटी आराखड्यामधील स्पेशल पर्पज व्हेईकलला (एसपीव्ही) कर लावणे, कर्ज काढणे, मालमत्ता गहाण ठेवण्याबाबतच्या वादग्रस्त तरतुदी, महापालिकेची स्वायत्तता, केवळ एकाच भागावर मोठ्याप्रमाणात खर्च, आयुक्तांना सर्वाधिकार नको, याबाबतच्या उपसूचना मांडल्या जाणार आहेत. या उपसूचनांसह आराखडा मंजूर झाला, तर केंद्रीय पातळीवरील स्पर्धेमध्ये पुण्याचा सहभाग अडचणीत येऊ शकतो.