कुमार सप्तर्षी गौरव सोहळा: मोदी सरकारवर टीका,कुमार यांच्या पत्नी उर्मिला यांनी हृद्य शब्दात विवाहापासूनचा वृत्तांत कथन केला. कुमार व आपण मित्र म्हणूनच सहवासात आहोत, तो इतरांविषयी कायम बोलतो, मात्र आपल्याविषयी दोन ओळीही बोलत नाही अशी लडिवाळ तक्रारही त्यांनी केली. कुमार यांनी मी जास्त बोलणार होतो पण आता दोन ओळीच बोलाव्या लागणार असे उत्तर त्यांना दिल्यावर सभागृहात हशा पिकला.ऑनलाइन लोकमतपुणे. दि. २१ : 'विरोधी विचार मांडला की त्या विचारांसह तो मांडलेल्यांनाही नष्ट केले जात आहे. पटणारा विचार स्पष्टपणे मांडणे म्हणजेच सत्याग्रह व तो करण्याची आज सर्वाधिक गरज आहे हे ओळखून कुमार सप्तर्षी यांनी पुन्हा कार्यरत व्हावे व क्रांतीची हाक द्यावी असे आवाहन माजी न्यायमुर्ती नरेंद्र चपळगावकर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक दिग्गजांनी केले. तरूण प्रश्न विचारायचे बंद होत नाहीत तोपर्यंत निवृत्त होणार नाही असे यावेळी कुमार यांनी सांगितले.
युवक क्रांती दलाचे संस्थापक व ज्येष्ठ विचारवंत कुमार सप्तर्षी यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यानिमित्त गणेश कला क्रिडा मंच येथे आयोजित या कार्यक्रमाला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, पालकमंत्री गिरीश बापट, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी न्यायमुर्ती व सप्तर्षी गौरव सोहळा समितीचे अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर, अरूण गुजराथी, संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे, खासदार हुसेन दलवाई, महापौर प्रशांत जगताप आदी अनेक दिग्गज उपस्थित होते. सप्तर्षी यांची समाजवादी विचारधारा व शिवसेनेचे हिंदुत्ववादी विचार यामुळे ठाकरे यांच्या उपस्थितीने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. गेले काही दिवस सोशल मिडीयावरून त्यासंबधात चर्चाही सुरू होती.
कुमार यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीच्या आठवणी सांगून त्यांच्याशी आपले ऋणानुबंध होते, मी त्यांचा आवडता होतो, उद्धव यांची येथील उपस्थिती त्यामुळे आहे असे स्पष्ट केले. तोच संदर्भ घेत ठाकरे यांनी कुमार जातपातधर्म मानत नाहीत, आम्हीही जातपात मानत नाही, मात्र धर्म मानतो, कारण धर्म नसेल तर अधर्माची भिती असते असे सांगितले. राज्यपाल होण्यासाठी कुमार एकदम फीट आहेत, त्यांनी लिहिलेले पुस्तक चाळले, त्यात एकदोन ठिकाणी शिवसेना असे लिहिलेले आहे, सविस्तर वाचनानंतर काय आहे ते समजलेच असे ठाकरे म्हणाले. भाषणानंतर ते लगेचच निघून गेले.त्यांच्या अनुपस्थितीतच नंतर कुमार यांच्यासह सर्व वक्त्यांनी केंद्र तसेच राज्य सरकारच्या धोरणांवर टीका केली. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले,ह्यह्य वैचारिक ताकद काय असते ते कुमार यांनी दाखवून दिले आहे. देश ज्यामुळे सर्व क्षेत्रात मागे राहिला तेच प्रतिगामी विचार रुजवायचा प्रयत्न आज पुन्हा सुरू आहे. आज पुन्हा एकदा क्रांतीची गरज आहे. तांत्रिक सुधारणांमुळे आता कुमार घरबसल्या ही क्रांती करू शकतात. त्यांनी युवकांना मार्गदर्शन करावे.ह्णह्ण चपळगावकर म्हणाले,ह्यह्यहा सत्कार फक्त कुमारांचा नाही तर त्यांच्या हाकेला धावून येणाऱ्या तत्कालीन सर्व युवकांचा आहे. आजही तसे संघटन करण्याची गरज आहे. जातपातधर्म व राजकीय फायदा यांचा विचार न करणारे युवक कुमार पुन्ही उभे करू शकतात. स्वांत्र्याचा हा दुसरा लढा आहे.ह्णह्णखासदार हुसेन दलवाई, मोरे, गुजराथी, माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी युक्रांद चळवळीतील काही आठवणींचे स्मरण केले. पालकमंत्री बापट यांनी मतभेद असले तरीही कुमार यांची वैचारिक प्रामाणिकता आपल्यासाठी महत्वाचे आहे असे सांगितले. महापौर जगताप, आमदार बच्चू पाटील, मिलिंद आव्हाड, उल्हास पवार, अभिनेता गिरीश कुलकर्णी यांचीही भाषणे झाली. कुमार यांनी आपल्या कारकिर्दीचा सविस्तर आढावा घेतला व युवकांसाठी कार्यरत राहणार असल्याचे जाहीर केले. सुधीरगाडगीळयांनीसुत्रसंचालनकेले.