पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील वाहतूक वाढली आहे. एका वर्षात १ लाख २६ हजार ५५१ वाहनांची वाढ होऊन टोलमध्ये दर महिना ७ कोटींची वाढ झाली आहे़ यशिवाय पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर जमा होणाऱ्या टोलच्या रकमेत २ कोटींची वाढ झाली आहे़ गेल्या वर्षी एप्रिल २०१५मध्ये एक्स्प्रेस-वेवरून एकूण १६ लाख ४१ हजार ९८ वाहने गेली होती़ या वर्षी एप्रिल १६मध्ये १७ लाख ६७ हजार ६४९ वाहने गेली असून, ४३ कोटी ८४ लाख ८६ हजार ३५४ रुपयांचा टोल जमा झाला़ गेल्या वर्षी याच महिन्यात ३६ कोटी ८४ लाख ७८ हजार १२६ रुपये टोल जमा झाला होता़ पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४वरील वाहतूकदेखील वाढली. गेल्या वर्षीच्या तुलनेत २८ हजार ३३० वाहनांची वाढ झाली आहे़ गेल्या वर्षी एप्रिल १५मध्ये या महामार्गावरून ९ लाख २८ हजार ९५२ वाहने गेली होती़ यंदा एप्रिल १६मध्ये १० लाख ५७ हजार ३१२ वाहने गेली़ त्यांच्याकडून १७ कोटी ४२ लाख २६ हजार ५९ रुपये टोल जमा झाला आहे़ (प्रतिनिधी)
द्रुतगती महामार्गावरील टोलमध्ये महिन्याला ७ कोटींनी वाढ
By admin | Published: May 18, 2016 5:31 AM