नागपूर - राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना ३४ हजार कोेटींची छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली. यातील ३८ लाख शेतकºयांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली. कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज करताना जी खाती जुळलेली नाही त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. अशा शेतकºयांनाही कर्जमाफीचा लाभ मिळावा, यासाठी माहिती मिळण्याकरिता टोल फ्री क्रमांक सुरू करणार असल्याची माहिती सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी मंगळवारी विधान परिषदेत प्रश्नाच्या उत्तरात दिली. सदस्य हेमंत टकले, विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. परंतु अद्याप सरसकट सर्व शेतकºयांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीच्या घोषनेनंतरही राज्यात सुमारे एक हजार शेतकºयांनी आत्महत्या केली. जाचक अटी व सदोष कार्यप्रणालीमुळे अनेक शेतकरी कर्ज माफीच्या योजनेपासून वंचित आहेत. सर्व शेतकºयांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी टोल फ्री क्रमांक सुरू करण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी केली. सोलापूर जिल्ह्यातील ३५ शेतकºयांच्या यादीत त्रुटी असून ती पोर्टलवर दिसत नसल्याचे हेमंत टकले यांनी सांगितले. यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शेतकºयांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला नसल्याचे हरिसिंग राठोड म्हणाले. कर्जमाफीच्या योजनेपासून कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, अशी ग्वाही सुभाष देशमुख यांनी प्रश्नाच्या उत्तरात दिली.क्रेडिट सोसायटीच्या गैरव्यवहाराची दोन महिन्यात चौकशीमुंबई जेट एअरवेज एम्प्लॉईज को.आॅप. क्रेडिट सोसायटी लि. या संस्थेच्या गैरव्यवहाराची आर्थिक व प्रशासकीय चौकशी दोन महिन्यात करण्यात येईल, अशी ग्वाही सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी प्रश्नाच्या उत्तरात दिली. सदस्य किरण पावसकर यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता.महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम ,१९६० अन्वये चौकशी करण्याकरिता ३० डिसेंबर २०१७ रोजीच्या आदेशान्वये नियुक्त करण्यात आलेल्या प्राधिकृत अधिकाºयांमार्फत संबंधित अपहाराची चौकशी सुरू असल्याचे देशमुख यांनी सांगितले. क्रेडिट सोसायटीने कर्जवाटप करताना कर्जदाराला मिळणाºया वेतनापेक्षा कर्जाचा हप्ता अधिक येत आहे. असे कर्ज वाटप केल्याचे पावसकर यांनी निदर्शनास आणले. हेमंत टकले, विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनीही चर्चेत सहभाग घेतला.
कर्जमाफीसाठी टोल फ्री क्रमांक सुरू करणार, पणन मंत्री सुभाष देशमुख यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 5:45 AM