मुंबई : लहान गाड्यांना टोलमुक्ती देण्यात आली असली तरी या गाड्यांचा टोल राज्य शासन भरणार आहे, अशी माहिती बुधवारी मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी उच्च न्यायालयात दिली़ते म्हणाले की, राज्यात ५२ टोलनाक्यांवर टोलमुक्ती देण्यात आली आहे. टोल कंपनीच्या शासनाशी आधी झालेल्या करारानुसार प्रत्येक वर्षाची टोलची रक्कम शासनाला कळविणार आहे आणि ही रक्कम शासन या कंपनीला देईल़ शासनाला मिळालेल्या महसुलातून ही रक्कम देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
टोलमुक्ती दिलेल्या गाड्यांचा टोल सरकार भरणार -हायकोर्ट
By admin | Published: June 18, 2015 2:46 AM