नाशिक : राज्यातील टोलवसुली विरोधात आंदोलन छेडणारे मनसेचे राज ठाकरे यांनी ४४ टोलनाके बंद केल्यानंतरही नाराजी व्यक्त केली असून, यापूर्वी बंद करण्यात आलेले ६५ टोलनाके कोणते होते, असा प्रश्न उपस्थित केला आहे. जोपर्यंत आघाडी शासन टोलविषयी पारदर्शक धोरण जाहीर करीत नाही तोपर्यंत टोलचा प्रश्न सुटलेला नाही, असे ठाकरे यांनी सांगितले. ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितले, की गेल्या दीड वर्षामध्ये मुख्यमंत्र्यांशी टोलप्रश्नी तीन वेळा भेट घेतले. आघाडी शासनाने टोल धोरण जाहीर केलेले नाही. त्यामुळे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. पूर्वी ६५ आणि आता ४४ टोलनाके बंद केल्याचे सरकार जाहीर करीत असेल, तर राज्यात किती टोलनाके आहेत याची माहिती नको द्यायला? केंद्राच्या धोरणानुसार ८० किलोमीटरच्या आत टोलनाका नसावा. असे असताना राज्य शासनाने ३०-४० किलोमीटरच्या आत टोलनाके आणलेत. त्यामुळे अनेकांचा १० किलोमीटरच्या आत दोन वेळा टोल भरावा लागतो. जिथे पैशांचा व्यवहार येतो तिथे पारदर्शकता असायला हवी, ती नाही. कठोर कारवाईिशवाय वचक बसणार नाहीकॅम्पा कोलासारख्या असंख्य इमारती मंुबई-ठाण्यात अन् राज्यात आहेत. अशा इमारती उभारणारे बिल्डर्स, त्यांना परवानगी देणारे पालिकेचे अधिकारी, कर्मचारी, तत्कालीन नगरसेवक दोषी असताना, केवळ रहिवाशांना दोषी ठरवून त्यांना बेघर करणे साफ चुकीचे आहे. नियम, कायदा सर्वांसाठी सारखा असून, शासन जोपर्यंत कठोर कारवाई करीत नाही तोपर्यंत अशी अनधिकृत कामे करणार्यांवर वचक बसणार नाही. परंतु आदर्श प्रकरण आपण पाहतो आहोतच. दोषी अधिकार्यांना पुन्हा सेवेत घेतले गेले. - राज ठाकरे
टोलप्रश्नी राज ठाकरे नाराजच
By admin | Published: June 10, 2014 10:40 PM