मनीषा म्हात्रे - मुंबई
निवडणूक काळात मोठय़ा प्रमाणात पैशांची होणारी अवैध वाहतूक तसेच कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये यासाठी टोलनाके पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यातही मुलुंड टोलनाका, आनंदनगर टोलनाका आणि ऐरोली टोलनाका या प्रमुख तीन टोलनाक्यांवर पोलिसांची करडी नजर असून दुचाकीपासून प्रत्येक वाहतूकदाराकडे तपासणी सुरू आहे. यामध्ये 5क् हजारांपेक्षा जास्त रक्कम घेऊन एखादा चालक आढळला तर त्याला पोलीस चौकशीला सामोरे जावे लागेल तर 1क् लाखांपेक्षा जास्त रक्कम आढळल्यास त्याला आयकर विभागाच्या कठडय़ात उभे राहण्याची वेळ येणार आहे.
मुलुंड एलबीएस मार्ग येथील मॉडेला टोलनाका, पूर्व द्रुतगती मार्गावरील आनंद नगर टोलनाका आणि ऐरोली टोलनाका या तिन्ही टोलनाक्यांवरून मुंबई, नवी मुंबई आणि ठाणो मार्गाचे दुवे जोडले गेले आहेत.
त्यातही पैशांबरोबरच दारू, गिफ्ट, कुपन्स आदींचीही तपासणी केली जात आहे. मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी काही वस्तूंची वाहतूक करून आचारसंहितेचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यावर तत्काळ कारवाई करण्यासाठी निवडणूक अधिका:यांच्या जोडीला पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिका:याने दिलेल्या माहितीनुसार, वाहनचालकांकडे 5क् हजारांपेक्षा जास्त रक्कम आढळल्यास त्याला पोलीस आणि निवडणूक अधिका:यांच्या चौकशीला सामोरे जावे लागेल.
यामध्ये पैशांबाबत योग्य माहितीची शहानिशा केल्यानंतरच त्याची यातून सुटका होणार आहे. तर दहा लाखांपेक्षा जास्त रक्कम आढळल्यास त्याला आयकर विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या काळात अवैधरीत्या कारभार करणा:यांना चांगलाच चाप बसणार असल्याचे या वेळी चित्र पाहावयास मिळणार आहे. (प्रतिनिधी)