नवी मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. 15 ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. औद्योगिक कारखाने व इतर खासगी आस्थापनांत काम करणा:या कामगारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी 15 ऑक्टोबर रोजी कामगारांना सुट्टी देण्याचे आदेश कामगार आयुक्तांनी दिले आहेत.
नवी मुंबई क्षेत्रत विधानसभेचे ऐरोली व बेलापूर असे दोन मतदार संघ आहेत. ऐरोली मतदार संघात आशिया खंडातील सर्वात मोठा म्हणून ओळखला जाणारा ठाणो-बेलापूर औद्योगिक पट्टा आहे. या क्षेत्रतील विविध लहान - मोठय़ा कंपन्यांतून जवळपास दीड लाख कामगार काम करतात. तर बेलापूर विधानसभा मतदार संघात अनेक निवासी हॉटेल्स, शॉपिंग मॉल्स, रिटेलर्स, आयटी कंपन्या आहेत. या सर्व आस्थापनांत मोठय़ाप्रमात कामगार काम करतात. या सर्व कामगारांना मतदान करता यावे, यासाठी 15 ऑक्टोबरला भरपगारी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याचे आदेश संबंधित आस्थापनांना देण्यात आले आहेत. एखादय़ा आस्थापनेला संपूर्ण दिवस सुट्टी देणो शक्य नसल्यास किमान दोन तासाची किंवा मतदानाचा हक्क बजावता येईल, यादृष्टीने वेळेची सवलत द्यावी, असेही कामगार आयुक्तांकडून सूचित करण्यात आले आहे. मतदानासाठी सुट्टी किंवा वेळेची सवलत न देणा:या आस्थापनांच्या विरोधात तक्रार करण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे. (प्रतिनिधी)