शहरं
Join us  
Trending Stories
1
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
4
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
5
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
6
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
7
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
8
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
9
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
10
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
11
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
12
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
13
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
14
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
15
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
16
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
17
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
18
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
20
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील

‘यूपी’नंतर सर्वाधिक बेघर महाराष्ट्रात !

By admin | Published: December 05, 2015 12:36 AM

देशातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात (यूपी) सर्वाधिक बेघर आहेत. उत्तर प्रदेशापाठोपाठ विकसित म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात सर्वाधिक बेघर आहेत.

नवी दिल्ली : देशातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात (यूपी) सर्वाधिक बेघर आहेत. उत्तर प्रदेशापाठोपाठ विकसित म्हणवणाऱ्या महाराष्ट्रात सर्वाधिक बेघर आहेत. चार वर्षांपर्यंत देशात २ लाख ५६ हजार ८९६ बेघर कुटुंबे होती. विशेष म्हणजे विकसित राज्यांत बेघरांची संख्या तुलनेने अधिक आहे.राज्यसभा खासदार विजय दर्डा यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरादाखल गृह व नागरी गरिबी निर्मूलन राज्यमंत्री बाबूल सुप्रियो यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. गोठवणाऱ्या थंडीत बेघर असलेल्यांचे मृत्यू आणि अशा लोकांच्या आश्रयासाठी सरकारने कोणती पावले उचलली? याबाबत दर्डा यांनी सविस्तर प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना सुप्रियो यांनी सांगितले की, २०११च्या जनगणना आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेशात ४१,२२७ कुटुंबे बेघर होती. महाराष्ट्रात ही संख्या ३२,६६४ एवढी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गृहराज्य गुजरातमध्ये २३,९८७ कुटुंबांच्या डोक्यावर छत नव्हते; तर अविभाजित आंध्र प्रदेशातही चार वर्षांपूर्वी २३,३७६ कुटुंबे छत नसल्याने उघड्यावर रात्र काढत होती. शहरातील बेघर लोकांना आश्रय देणे ही राज्यांची जबाबदारी आहे. अर्थात, राज्य सरकारांद्वारे अशा लोकांसाठी ‘निवारे’ उभारण्यासाठी गृह व नागरी गरिबी निर्मूलन मंत्रालयाकडून राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (एनयूएलएम) राबवले जात आहे. याचप्रकारे शहरी बेघरांसाठी ‘रैन बसेरा(एसयूएच)’ नामक योजना राबवली जात आहे. यात पायाभूत सुविधा आणि स्थायी आश्रय दिला जातो. राज्य सरकारच्या माध्यमातून ही योजना राबवली जाते, असेही त्यांनी सांगितले.एनयूएलएमअंतर्गत सर्वाधिक १२९ ‘निवारे’ मध्य प्रदेशात उभारण्यात आले आहेत. तामिळनाडूत ९५, उत्तर प्रदेशात ७३, बिहारात ४८, प. बंगालमध्ये ४५ तर महाराष्ट्रात बेघरांसाठी १३ ‘निवारे’ उभारण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)