मुंबई : राज्यातून मान्सून परतीच्या वाटेवर असतानाच अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणून पुढील २४ तासांसाठी कोकणासह दक्षिण मध्य महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे; शिवाय मुंबई आणि आसपासच्या परिसरातही मेघगर्जनेसह मुळसधार पाऊस कोसळेल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील कमाल, किमान तापमान वाढू लागले आहे. मुंबईचे कमाल तापमान ३२वरून ३४ अंशावर, तर किमान तापमान २४वरून २६ अंशावर पोहोचले आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता येत्या २४ तासांत वाढण्याची शक्यता असल्यामुळे मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे. समुद्र खवळलेला असणार आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीवरील मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये, असे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)
राज्यात मुसळधार पावसाचा इशारा!
By admin | Published: October 10, 2015 2:26 AM