शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
3
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
4
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
5
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
6
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
7
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
8
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
9
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
10
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
11
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
12
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
13
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
14
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
15
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल
16
आकाश कोसळले तरी चालेल, न्याय दिला गेलाच पाहिजे!
17
एकत्र लढतील, दिसतील; पण एकत्र राहतील?
18
निवडणुका अनेक, देश एक!
19
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
20
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय

अभियांत्रिकी सीईटीला तूर्तास स्थगिती

By admin | Published: April 29, 2017 2:06 AM

वैद्यकीय प्रवेश परीक्षेनंतर आता अभियांत्रिकीला प्रवेश घेऊ इच्छिणारे १२ वीचे विद्यार्थीही संभ्रामवस्थेत आहेत. कारण, मनुष्यबळ

मुंबई : वैद्यकीय प्रवेश परीक्षेनंतर आता अभियांत्रिकीला प्रवेश घेऊ इच्छिणारे १२ वीचे विद्यार्थीही संभ्रामवस्थेत आहेत. कारण, मनुष्यबळ विकास मंत्रालयाने अभियांत्रिकीची सामान्य प्रवेश परीक्षेला (सीईटी) स्थगिती दिली आहे. तर, दुसरीकडे सर्व राज्यांमध्ये एकमत न झाल्याने देशपातळीवर घेतली जाणारी प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली आहे. वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेमध्ये पारदर्शकता यावी, सर्वांना समान संधी मिळावी म्हणून नीट परीक्षा सुरु करण्यात आली. या परीक्षेलाही राज्यातून विरोध झाला होता. पण, सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी देशपातळीवर नीट परीक्षा घेण्यात आली. त्याचप्रमाणे आता अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) येत्या शैक्षणिक वर्ष २०१८ पासून अभियांत्रिकीसाठी एकच प्रवेश सीईटी होईल अशी घोषणा मार्च महिन्यांतच केली होती. मात्र, या निर्णयाला पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू सरकारने विरोध केला आहे. सर्व राज्यांत एकमत होत नाही. याआधी प्रत्येक राज्यांमध्ये अभियांत्रिकीची प्रवेश परीक्षा घेण्यात येत होती. पण, आता देशपातळीवर एकच परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. पण, राज्यांमध्ये एकमत होत नसल्याने या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. अजून कोणताच निर्णय झाला नसल्याचे एआयसीटीईचे अध्यक्ष अनिल सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले. अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी आताही विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा द्यावी लागते. आता राज्यपातळीवर परीक्षा होते यानंतर देश पातळीवर परीक्षा होणार. अभ्यासक्रम सारखाच असेल त्यामुळे विद्यार्थ्यांनी ताण घेण्याची गरज नाही. पण, दोन्ही परीक्षा घेण्यात येणार असतील तर गुण कसे देणार, काठिण्य पातळी कशी असणार याविषयी स्पष्टता करणे आवश्यक आहे. कोणत्या निकषांवर गुण दिले जाणार आणि त्याचे मुल्यांकन कसे होणार, कुठच्या इन्स्टिट्यूटमध्ये कोणत्या गुणांवर प्रवेश देणार हे स्पष्ट केले पाहिजे. विद्यार्थ्यांना मोठा फरक पडण्याची आवश्यकता नसल्याचे मत व्हीजेटीआयचे प्रा. व्ही. बी. नाईक यांनी सांगितले. (प्रतिनिधी)