नाशिक : उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील शासकीय रुग्णालयात शेकडो अर्भकांचे बळी गेल्याचे प्रकरण ताजे असताना नाशकातील जिल्हा रुग्णालयात महिनाभरात तब्बल ५५ अर्भकांचा मृत्यू झाल्याचे वास्तव समोर आले आहे. इनक्युबेटरसह अन्य सुविधा अपु-या असल्याने हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले आहे.रुग्णालयातील विशेष नवजात शिशू दक्षता विभागात मुळात १८ ‘वॉर्मर’ठेवण्याची क्षमता आहे. तेथे उपचारासाठी तब्बल ३५० अर्भके आॅगस्टमध्ये दाखल झाली होती. त्यापैकी ५५ बालकांचा श्वास ‘व्हेंटिलेटर’अभावी थांबल्याचे उघडकीस आले आहे.या रुग्णालयात ‘टर्शरी केअर सेंटर’ नसल्यामुळे आॅक्सिजनची गरज भासणाºया नवजात शिशुंना व्हेंटिलेटरसह तज्ज्ञ डॉक्टरदेखील पुरविणे शक्य होत नाही. यामुळे अखेरच्या टप्प्यात धोक्याची पातळी ओलांडलेल्या गंभीर शिशुंचा आॅक्सिजनअभावी मृत्यू होत असल्याचे रुग्णालयाच्या प्रशासनाने क बूल केले. विशेष, नूतन इमारतीकरिता शासनाने २१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध क रून दिला आहे; मात्र रुग्णालयाच्या आवारातील काही गुलमोहरांच्या झाडे तोडण्यास वृक्षप्राधिकरण समितीकडून परवानगी मिळत नसल्याने हे कामा रखडल्याचे डॉ. सुरेश जगदाळे यांनी सांगितले.
नाशकातील जिल्हा रुग्णालयात महिनाभरात तब्बल ५५ अर्भकांचा मृत्यू, सुविधा अपु-या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 4:10 AM