शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशी पद्धत असते का?"; जयंत पाटलांचा फडणवीस-पवारांना सवाल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
3
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
4
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!
5
चर्चा तर होणारच! भाजपाचा मुख्यमंत्री होईल असं राज ठाकरे म्हणाले अन् देवेंद्र फडणवीसांसोबतचे फोटो समोर आले!
6
नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत ट्विस्ट: अजित पवारांच्या नव्या वक्तव्याने चर्चांना उधाण
7
कुडाळात महायुती, उद्धवसेनेचे कार्यकर्ते भिडले, तणावाचे वातावरण; पोलिस बंदोबस्त वाढविला
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'फडणवीसांनीच आरोप केले, त्यांनीच फाईल दाखविली'; सुप्रिया सुळे म्हणाल्या, आर. आर. पाटलांच्या कुटुंबाची माफी मागितली...
9
चीनच्या सैन्याची माघार, आता दिवाळीत तोंड गोड करणार; लष्कराने सीमेवरती स्थिती सांगितली
10
KL राहुलनं नाकारली LSG नं दिलेली ऑफर? हे कारण देत सोडलीये संघाची साथ
11
निवडणुकीपूर्वीच राज ठाकरेंना धक्का; मनसे उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद, कारण...
12
दौरे ठरले! मल्लिकार्जून खर्गे अन् राहुल गांधी महाराष्ट्रात येणार; नागपूर, मुंबईत सभा होणार
13
भाजपचा विरोध, पण दादांनी..."; नवाब मलिकांनी सांगितलं काय घडलं राजकारण
14
भुजबळांच्या 'त्या' विधानावर राज ठाकरेंचा खोचक सल्ला, म्हणाले- "त्यांनी एक पक्ष काढावा आमचा...!"
15
'मैंने प्यार किया'ची सुमन वयाची पन्नाशी उलटली तरी आताही दिसते तितकीच ग्लॅमरस, पाहा फोटो
16
"महाराष्ट्राच्या प्रगतीचा भाजपा आणि महायुतीचा दावा फसवा आणि खोटा’’, नाना पटोले यांची टीका  
17
भाजपाचा प्रचारसभांचा धडाका! PM मोदी ८, अमित शाह २० सभा घेणार; योगी आदित्यनाथांच्या किती?
18
“मनसे सत्तेत येईल, आमच्या पाठिंब्यावर भाजपाचा मुख्यमंत्री होईल”; राज ठाकरेंचे स्पष्ट संकेत
19
रितेश देशमुखचा अमित व धीरज यांना पाठिंबा, विधानसभा निवडणुकीसाठी दिल्या खास शुभेच्छा!
20
मागच्या ५ वर्षांत महाराष्ट्रातील राजकारणात झालेल्या चिखलाला जबाबदार कोण? राज ठाकरेंनी दोन शब्दात दिलं उत्तर

पर्यटकांच्या बसचे टायर फुटले, मोठा अपघात टळला

By admin | Published: February 26, 2017 9:42 PM

अजिंठा लेणीत जाणाऱ्या प्रदूषण मुक्त एसटीबसचे अचानक टायर फुटले. यामुळे पर्यटक घाबरले असले तरी त्यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही

श्यामकुमार पुरे/ ऑनलाइन लोकमतसिल्लोड, दि. 26 -  अजिंठा लेणीत जाणाऱ्या प्रदूषण मुक्त एसटीबसचे अचानक टायर फुटले. यामुळे पर्यटक घाबरले असले तरी त्यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. ही घटना रविवारी घडली.फर्दापुर ते अजिंठा लेणी या 4 किलोमीटरचे रस्ते खराब झाल्याने अजिंठा लेणी अंतर्गत रस्त्यांच्या सुविधांचा विषय ऐरणीवर आला आहे.जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी देश - विदेशातून आलेल्या पर्यटकांना खड्डेमय रस्त्याच्या सामना करावा लागत आहे. फर्दापुर येथून टी पॉइंट ते अजिंठा लेणी जाणाऱ्या जवळपास 4 किमी अंतरातील रस्ताची अक्षरशः चाळणी झाली आहे.पर्यटक घेऊन जाणाऱ्या बस चे या खडडेमय रस्त्यामुळे मागील टायर फुटल्याने अपघात घडला. या घटनेत सुदैवाने प्राण हानी झाली नसली तरी प्रशासनची मान खाली नक्कीच झाली.बस च्या काचेतून अअजिंठा डोंगर दरीतील निसर्ग दर्शन घेणाऱ्या पर्यटकांना बस च्या खाली उतरताच " भारत दर्शन घडले"!अजिंठा लेणीवर प्रदूषणाचा परिणाम होवू नये यासाठी येथे फर्दापुर टी पॉइंट पासून लेणी पर्यन्त महामंडळाची प्रदूषण विरहित बससेवा सक्तिचि आहे. अवघ्या 4 किलो मीटर अंतरासाठी पर्यटकांना वातानुकूलित व् साद्या बस साठी 20 रूपये टिकिट घेवून पर्यटन विभाग घेवून पर्यटकांची लूट करीत आहे. येण्या जाण्या साठी 40 रूपये मोजावे लागतात.पण या प्रवासात पैसे देवूनही खड्यांचा परिणाम पर्यटकांना भोगावा लागत आहे.या रस्त्यावर सदर बस चे टायर फुटल्यामुळे बस मधे बसलेले सर्व देशी - विदेशी पर्यटक घाबरले . या घटनेत कोणत्याच् प्रकारची हानी झाली नसली तरी जागतिक पर्यटकांना मिळणाऱ्या सुविधा व् सुरक्षितता ढेपाळल्याचे लक्षात येते. याच बस चे जर पुढचेटायर फुटले असते तर मोठा अपघात घडला असता मग लेणी प्रशाशन हा मोठा अपघात घडण्याची वात पाहत आहे का असा प्रश्न समोर येत आहे .या बाबत लेणी प्रशाशनाशी संपर्क होवू शकला नाही. मिळालेल्या माहीती प्रमाणे 2009 साली या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने केले होते.त्यानंतर रस्त्याची साधी डागडूजी येथे झालेली नाही.लेणी सायंकाळी बंद होते.तरीही या रसत्याने सुरक्षेच्या दृस्टितुन पुरेसा प्रकाश व्यवस्था नाही.काही ठराविक मोबाइल कंपन्यांची येथे रेंज आहे.फोन न लागने येथील नेहमीची समस्या आहे.मार्च अखेर या रस्त्याची किमान डांबरी नुतनिकरण ( पॅचेस ) झाले पाहिजे अशी मागणी जोर धरत आहे.मेक इन इंडिया,मेक इन महाराष्ट्र,भारत दर्शन,अतुल्य भारत या सारख्या खर्चिक जाहिराती अजिंठा येथील असुविधेने फोल ठरत आहे. कारण जागतिक बँका, भारत व् जापान सरकारच्या कोटयावधि रुपयांचा निधि खर्चून जगप्रसिद्ध अजिंठा लेनीत जाणारी वाट खड्डेमय आहे.या कड़े पर्यटन विभागाचे दुर्लक्ष होत असून या कड़े लक्ष्य घालून रास्ता तत्काल दुरुस्त करावा अशी रास्त मागणी पर्यटक करीत आहे.