शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
2
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
3
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
5
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
6
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
7
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
8
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
9
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
10
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
11
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
12
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
13
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
14
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
15
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
16
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
17
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
18
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
19
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं

जंजिऱ्याच्या तटबंदीबाहेर पर्यटकांची कोंडी

By admin | Published: November 08, 2016 2:41 AM

दिवाळीच्या सुटीमध्ये जंजिरा किल्ला पाहावयास जाणाऱ्या पर्यटकांची समुद्रामध्येच कोंडी केली जात आहे. ६ नोव्हेंबरला हजारो पर्यटकांना किल्ल्याच्या बाहेर दोन तास ताटकळत ठेवण्यात आले

नामदेव मोरे, नवी मुंबई दिवाळीच्या सुटीमध्ये जंजिरा किल्ला पाहावयास जाणाऱ्या पर्यटकांची समुद्रामध्येच कोंडी केली जात आहे. ६ नोव्हेंबरला हजारो पर्यटकांना किल्ल्याच्या बाहेर दोन तास ताटकळत ठेवण्यात आले. होडीत चढ - उतार करण्यासाठीही योग्य व्यवस्था नसल्याने अपघाताची स्थिती निर्माण झाली होती. जीव मुठीत घेवून पर्यटकांनी किल्ल्यावरील भग्न अवशेष पाहून तीव्र नाराजी व्यक्त केली. देशाच्या इतिहासामध्ये तब्बल ३३० वर्षे अजिंक्य राहिलेला किल्ला म्हणून जंजिऱ्याची ओळख आहे. मात्र पुरातत्व विभाग व स्थानिक आस्थापनांच्या अनागोंदी कारभारामुळे तिथे जाणाऱ्या पर्यटकांचा भ्रमनिरास होत आहे. मुरूड शहरामध्ये प्रवेश केला की नगरपालिकेच्यावतीने २० रूपये प्रवेशशुल्क आकारले जाते. राजपुरी गावात प्रवेश करताच ग्रामपंचायतीकडून १० रूपये प्रवेश शुल्क आकारले जात आहे. याशिवाय वाहनतळ शुल्क म्हणून प्रत्येक वाहनधारकाकडून ४० रूपये वसूल केले जात आहे. वाहनतळ नसताना विनाकारण पर्यटकांना भुर्दंड भरावा लागत आहे. रविवारी दोन हजार पर्यटक किल्ला पाहण्यासाठी आले होते. राजपुरी व इतर तीन ठिकाणावरून किल्ल्याच्या समोर गेल्यानंतर तिथे दोन तास समुद्रात थांबविण्यात येत होते. गर्दी असल्याने पर्यटकांची अडवणूक करण्यात आली. प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतरही होडीवरील कर्मचारी आम्ही काहीही करू शकत नाही, आतील पर्यटक बाहेर आल्याशिवाय तुम्हाला आतमध्ये सोडता येणार नाही, असे सांगितले जात होते. दोन तास समुद्रात अडकलेल्या पर्यटकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली. (अधिक छायाचित्रे/४)भूमिपुत्र राम पाटलाचा इतिहास उपेक्षितचसिद्दी यांनी ३३० वर्षे जंजिरा किल्ला अजिंक्य ठेवला. पण या किल्ल्याची मूळ संकल्पना होती कोळी बांधवांचा प्रमुख राम पाटील याची. राजपुरीमध्ये पूर्वी कोळी बांधवांची वस्ती होती. समुद्री चाच्यांचा उपद्रवापासून सुटका व्हावी यासाठी राम पाटील यांनी जंजिऱ्याच्या बेटावर मेढेकोट म्हणजे मोठाले ओंडके एका शेजारी एक लावून तटबंदी उभारली. पुढे निजामाने कटकारस्थान करून बेट ताब्यात घेतले व पुढे तिथे किल्ल्याचे बांधकाम सुरू केले. १६१७ मध्ये सिद्दी अंबरने बादशहाकडून सनद म्हणून किल्ला मिळविला व पुढे १९४७ पर्यंत तो त्यांच्याच ताब्यात होता. सिद्दीचे नाव आजही घेतले जाते पण ज्यांची ही संकल्पना होती त्या राम पाटलांचा इतिहासाचा सर्वांना विसर पडला. याचबरोबर पुरातत्व विभागाचेही या किल्ल्याकडे दुर्लक्ष होत असून येथे मोठी पडझड झाली आहे. किल्ल्यावर सर्वत्र गवत वाढले आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या विहिरींची कचरा कुंडी झाली आहे. किल्ल्यावर साफसफाई करण्यासाठी काहीही व्यवस्था नाही. या सर्व गैरसोयी कधी दूर होणार असा प्रश्न पर्यटकांनी उपस्थित केला. जंजिरा किल्ल्यावरील वास्तव राजपुरी बंदरावर घाणीचे साम्राज्य, साफसफाईची सोय नाहीराजपुरीमध्ये पर्यटकांकडून अनधिकृतपणे ४० रूपये पार्किंग शुल्क किल्ल्याच्या प्रवेशद्वाराबाहेर दोन तास सक्तीने थांबविले जात आहेहोडीतून उतरताना व चढताना अपघात होण्याची शक्यता होडीत दाटीवाटीने पर्यटक कोंबून भरले जात आहेत. किल्ल्यावर कुठेही माहिती फलक नाहीतपुरातत्व विभागाचे किल्ल्याच्या डागडुजीकडे पूर्णपणे दुर्लक्ष किल्ल्यावर पिण्यासाठी पाणी नाहीपर्यटकांसाठी प्रसाधनगृह व इतर काहीही सुविधा नाहीऐतिहासिक तलावांची झाली कचरा कुंडी तटबंदीमध्ये वृक्ष उगवल्याने किल्ल्याची सुरक्षा धोक्यातराणी महालाची भिंत कोसळून अपघात होण्याची शक्यता ऐतिहासिक तळ्यांचीही दुरवस्था जंजिरा ३३० वर्षे अजिंक्य राहिला तो किल्ल्यामधील गोड्या पाण्याच्या तळ्यांमुळे. समुद्राच्या मध्यभागी असलेल्या किल्ल्यावर जागोजागी तलाव व विहिरी आहेत. आताही या तळ्यांमध्ये मुबलक पाणी आहे. वास्तविक समुद्रात पिण्यायोग्य पाण्याचे झरे कसे आले याचे संशोधन होणे आवश्यक आहे. अभ्यासाचा व संशोधनाचा विषय असलेल्या तलावाची कचरा कुंडी होवू लागली असून येथे येणाऱ्या पर्यटकांना पिण्यासाठी एक घोट पाणी मिळेनासे झाले आहे.