मुंबई : राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायतीच्या अध्यक्ष पदाच्या आरक्षण निश्चित करण्यासाठी बुधवारी ५ आॅक्टोबर रोजी सोडत काढण्यात येणार आहे. नगर विकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्या उपस्थितीत ही सोडत होणार आहे. यंदा थेट मतदानातून अध्यक्ष निवड करण्याचा वटहूकुन राज्य सरकारने काढला होता. त्यामुळे निवडणुक प्रक्रीया सुरु करण्यासाठी आरक्षण निश्चित करणे आवश्यक होते. घटनेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांची मुदत संपण्यापूर्वी निवडणुकप्रक्रीया पार पाडणे बंधनकारक आहे. त्यामुळे नगरपरिषद निवडणुका आणि नगराध्यक्ष निवडीसाठी राज्य सरकारने नव्या अध्यादेशानुसार नियमावलीसह अन्य आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याची सूचना राज्य निवडणूक आयुक्त जे.एस.सहारिया यांनी राज्य सरकारला केली होती. त्यानुसार बुधवारी ५ आॅक्टोबर रोजी नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात येणार आहे. दरम्यान, थेट नगराध्यक्ष निवडीच्या सरकारच्या भूमिकेविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून ३ आॅक्टोबर रोजी त्यावर सुनावणी होणार आहे. (प्रतिनिधी)
नगराध्यक्ष आरक्षण सोडत बुधवारी
By admin | Published: October 03, 2016 4:25 AM