अकोला : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत रेफेरल ट्रान्सपोर्ट कार्यक्रमातील रुग्णवाहिका व मोबाइल मेडिकल युनिट वाहनांचा मागोवा घेण्याच्या उद्देशाने राज्यातील ४,८२१ वाहनांवर जीपीएस, जीपीआरएस प्रणाली अंतर्गत ट्रॅकर बसविण्यात येणार आहे.यासोबतच राज्यातील १०२ व १०८ रुग्णावाहिकांचे आरक्षण व मोबाइल मेडिकल युनिटचे ट्रॅकिंग करण्यासाठी मोबाइल अॅप्लिकेशन तयार करणे, तसेच १०२ कॉल सेंटर चालविण्यासाठी बाह्य यंत्रणा नियुक्त करण्यासंदर्भात राज्य शासनाने गुरुवारी शासन निर्णय निर्गमितकेला.राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत रेफेरल ट्रान्सपोर्ट कार्यक्रमातील रुग्णवाहिका व मोबाइल मेडिकल युनिट वाहनांना ट्रॅकर लावल्यामुळे सर्वच वाहने संपर्कात राहतील. यामुळे ही सेवा आणखी सुलभ होईल, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
राज्यातील ४ हजार रुग्णवाहिकांसह वैद्यकीय वाहनांवर लागणार ‘ट्रॅकर’!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 2:05 AM