शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

अन्य राज्यांमध्ये व्यापार खुला, महाराष्ट्रात जादा बंधनांमुळे नाराजी; व्यावसायिकांमध्ये कमालीची अस्वस्थता 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2021 2:20 PM

कोरोनाच्या निर्बंधांबाबत राज्यातील व्यापाऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. आमचे नुकसान होत आहे म्हणून आम्ही बोलत नाही. व्यापारावर पोटपाणी असलेल्या लाखो कष्टकऱ्यांचा विचार शासनाने करायला हवा, अशी भावना प्रमुख व्यापारी संघटनांनी केली आहे.

यदु जोशी -मुंबई : देशातील महत्त्वाच्या काही राज्यांमध्ये कोरोनासंदर्भातील निर्बंध शिथिल करण्यात आले असताना महाराष्ट्रातच कडक का, असा सवाल करीत आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे यासंदर्भातील तुलनात्मक माहिती सादर करण्यात आली आहे. तसेच दर दोन आठवड्यांनी आढावा घेण्याऐवजी कोरोना परिस्थितीचा दर आठवड्याला आढावा घेऊन निर्बंध शिथिल करा, अशी मागणीही होत आहे. (Trade open in other states, displeased with extra restrictions in Maharashtra; Extreme discomfort among professionals)कोरोनाच्या निर्बंधांबाबत राज्यातील व्यापाऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. आमचे नुकसान होत आहे म्हणून आम्ही बोलत नाही. व्यापारावर पोटपाणी असलेल्या लाखो कष्टकऱ्यांचा विचार शासनाने करायला हवा, अशी भावना प्रमुख व्यापारी संघटनांनी केली आहे. फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष वीरेन शहा यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. अत्यावश्यक व्यतिरिक्त असलेल्या दुकानांमध्ये एरवीदेखील प्रचंड गर्दी कधीही उसळत नाही. शिवाय तेथे जी काही गर्दी होईल तिचे नियोजन करून ती सुरू  करण्यास अनुमती दिली पाहिजे, अशी भूमिका असोसिएशनने या पत्रात घेतली आहे. सर्व प्रकारची दुकाने निदान रात्री ८ पर्यंत सुरू ठेवा, असे साकडे त्यांनी घातले आहे. 

उत्तर प्रदेशात शिथिलताउत्तर प्रदेशात कंटेनमेंट झोनव्यतिरिक्त अन्यत्र निर्बंध शिथिल केले आहेत. मॉल्स आणि रेस्टॉरंट सोमवार ते शुक्रवार रात्री ९ पर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याची अनुमती दिली आहे. कंटेनमेंट झोनबाहेरील दुकाने आणि बाजार हे सोमवार ते शुक्रवार सुरू ठेवण्याचीही अनुमती आहे. दिल्लीत मॉल्सना मुभादिल्लीमध्ये सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत बाजार, मॉल्स, बाजार संकुले आणि दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे तमिळनाडूमध्ये शॉपिंग मॉल्स, विविध देवस्थाने यांच्यासह व्यायामशा‌ळांना सुरू ठेवण्याची अनुमती आहे. 

पंजाब, केरळची स्थिती पंजाबमध्ये १० जुलैपर्यंत लॉकडाऊन राहणार असला तरी काही निर्बंध शिथिल केले आहेत. बार, पब ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास अनुमती दिली. प. बंगालमध्ये खासगी आणि  सरकारी बसेस ५० टक्के क्षमतेने धावत आहेत. चालक, वाहकांना लसीकरण अनिवार्य आहे. सलून, पार्लर सकाळी ११ ते सायंकाळी ६ पर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू आहेत. केरळमध्ये मुख्यमंत्री विजयन यांनी २४ जून रोजीच निर्बंध शिथिल केले. 

निर्बंध शिथिल कराकोरोना परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. रुग्णांची व मृत्यूसंख्यादेखील कमी होत आहे. पूर्वीप्रमाणेच दर आठवड्याचे रुग्णसंख्येचे आकडे समोर ठेवून आढावा घ्यावा व निर्बंध कमी अधिक करावेत, अशी आमची मागणी आहे.     - बी. सी. भरतिया, अध्यक्ष,     कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सव्यापाऱ्यांची रोजीरोटी, त्यांच्याकडील कामगारांना पगार, दुकानांचे भाडे व इतर गोष्टींचा आर्थिक मेळ साधण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी किमान रात्री ८ पर्यंत दुकाने उघडी ठेण्याची परवानगी द्यावी.- वीरेन शहा, अध्यक्ष, फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशन- राज्यातील तब्बल ३० जिल्हे हे तिसऱ्या स्तरामध्ये आहेत आणि त्यानुसार तेथे कडक निर्बंध लागू आहेत. - रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत आहे, मृत्यूही बोटावर मोजण्याइतकेच आहेत, असे जिल्हे आणि जिथे हे आकडे झपाट्याने कमी झालेले नाहीत असे जिल्हे एकाच म्हणजे तिसऱ्या स्तरात आहेत. - कोरोनावर नियंत्रण मिळविणाऱ्या जिल्ह्यांनाही त्यामुळे निर्बंधांचा सामना करावा लागत आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMarketबाजार