- गोपाल लाजूरकर।
गडचिरोली : सीतेचे हरण करणा-या लंकाधीश रावणाच्या पुतळ्याचे दस-याच्या दिवशी देशभर दहन करण्यात येते. मात्र दुसरीकडे याच राजा रावणाच्या शौर्याची गाथा गाऊन पूजन करण्याची परंपरा जिल्ह्यातील काही गावांत जोपासली जाते. विजयादशमीला या गावांतील आदिवासी बांधव मोठ्या आदरभावाने रावण महोत्सव साजरा करतात.धानोरा तालुक्यातील परसवाडी (दूधमाळा), धानोरा, कन्हाळगाव, रांगी, येरकडटोला, महावाडा, आरमोरी तालुक्यातील वानरचुवा, गडचिरोली तालुक्यातील चांदाळा, अहेरी तालुक्यातील कमलापूर, कोसेगुडम, मेडपल्ली, कुरखेडा तालुक्यातील मालदुगी तसेच कोरची आदी प्रमुख गावांसह अन्य काही लहान गावांमध्ये विजयादशमीच्या दिवशी रावण महोत्सव उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी आदिवासी बांधव राजा रावणाच्या पुतळ्याची गावातून मिरवणूक काढतात.आदिवासींची धारणाराजा रावण शूर-पराक्रमी, संगीत पारंगत, विद्वान व न्यायप्रिय होता. आदिवासींच्या मनात त्याला पूजनीय स्थान आहे. रावणाला ते दैवत मानतात. वैदिक साहित्यात रावणाचे विद्रूपीकरण केल्याने समाजात राजा रावणाबद्दल चुकीचा संदेश गेला असल्याचे आदिवासी साहित्यिक नंदकिशोर नैताम यांचे म्हणणे आहे.आज मूर्तीची प्रतिष्ठापणाकुरखेडा तालुक्यातील मालदुगी येथे यंदा प्रथमच राजा रावणाच्या लाकडी प्रतिमेची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे. पहांदीपारी कुपार लिंगो गोंडी धर्म महासंघ, शाखा मालदुगीच्या वतीने हा कार्यक्रम होणार आहे.