दासगाव : नवरात्रौत्सवात संपूर्ण देशात ग्रामीण आणि शहरी भागात ठिकठिकाणी गरबा, दांडिया खेळला जातो. गरबा हा खेळ गुजराती समाजाचा असल्याचे म्हटले जाते. मात्र दांडिया खेळ आदिवासी समाजामध्ये वेगळ्याच पध्दतीत साजरा करण्यात येत असून एक ाच ठिकाणी दांडिया खेळला जातो. रात्रीच्या वेळी आदिवासींंमध्ये कोणत्याही प्रकारचे गाणे न वाजवता एक विशिष्ट गाणे म्हणत वाडीवस्तीवर तसेच शहरांमध्ये जाऊन खेळला जातो. त्यामधून हा समाज आपला नऊ दिवस रोजगार उपलब्ध करतो. वर्षांनुवर्षे सुरू असलेली ही प्रथा महाड तालुक्यात आदिवासी समाजाने कायम ठेवली आहे.पूर्वीच्या काळात नवरात्र उत्सव हा एका विशिष्ट समाजाचा मानला जात असे. सध्याच्या काळात सर्व हिंदू समाज एकत्रित येऊन गावोगावी खेडोपाडी वाडीवस्ती तसेच शहरांमध्ये एका ठिकाणी नागरिक एकत्रित येऊन देवीची प्रतिष्ठापना करतात. रात्री त्याठिकाणी डीजे साऊंड तसेच स्पीकर व कलाकारांची गाणी लावून दांडिया खेळला जातो, मात्र शेकडो वर्षानुवर्षे सुरू असलेल्या आदिवासी समाजातील गरबा खेळ हा वेगळाच आहे. आदिवासी समाजात नवरात्रौत्सव सुरू झाला की पहिल्याच दिवसापासून अनेक वाडीवरील महिला एकत्रित येऊन आपल्या आदिवासी वाडीपासून जवळच असणारी गावे, शहर तसेच वाड्या याठिकाणी जाऊन विशिष्ट गाणी म्हणत दांडिया खेळतात. या माध्यमातून त्यांना आपला रोजगारही उपलब्ध करता येतो. यामुळे महाड तालुक्यात बहुतेक गावांमध्ये तसेच महाड शहरामध्ये वेगवेगळ्या खेड्यातून आदिवासी महिला दांडिया खेळताना आलेल्या पहावयास मिळत आहेत.
दांडिया खेळण्याची आदिवासींमध्ये प्रथा
By admin | Published: October 08, 2016 2:06 AM