ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ - पावसामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा बोजवारा उडालेला असतानाच बुधवारी दुपारी कसा-याजवळ मालगाडीचे इंजिन बंद पडल्याने कसा-याच्या दिशेने जाणारी वाहतूक तासाभरापासून ठप्प झाली आहे.
मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाणा-या मालगाडीचे इंजिन उंबरवाडीजवळ बंद पडले. बुधवारी दुपारी १२ ते १२.१५ दरम्यान ही घटना घडली. त्यानंतर ती मालगाडी पुढे नेण्यासाठी रेल्वे अधिका-यांनी दुसरे इंजिन बोलावले. मात्र ते येईपर्यंत तब्बल एक तास कसा-याच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली. रेल्वेसेवा अद्यापही विस्कळीत आहे.
पावासमुळे रोजच रेल्वेचा गोंधळ सुरू असताना आज इंजिन बंद पडल्याने लोकलसेवेवर परिणाम झाला आणि प्रवाशांच्या मनस्तापात आणखीनच भर पडली.